मनपा निवडणूक ऑगस्टमध्ये?

इच्छुकांचा हिरमोड; तयारी सुरूच
मनपा निवडणूक ऑगस्टमध्ये?

नाशिक । फारूक पठाण Nashik

मागील एक वर्षापासून नाशिक महापालिकेच्या निवडणुकीच्या ( NMC Elections )तयारीला लागलेल्या इच्छुकांना आणखी वाट पाहावी लागणार असल्याचे चित्र दिसत आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम पुढच्या महिन्यात म्हणजेच जुलैमध्ये ( Month of July ) जाहीर होण्याची शक्यता आहे. ओबीसी आरक्षण ( OBC Reservation ) मिळत नाही तोपर्यंत निवडणुका होणार नाही, असे राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील नेत्यांच्या वतीने सांगण्यात आले होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सध्या निवडणुकीच्या कामकाजाला सुरुवात झाली आहे तरी पूर्ण तयारी ला अजून दोन महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता गृहीत धरून जुलै अखेरच निवडणुकीचा कार्यक्रम घोषित होण्याची शक्यता आहे.

मनपाच्या सातव्या पंचवार्षिक निवडणूक केव्हा जाहीर होईल याकडे अगदी जानेवारीपासूनच आखाडे राजकीय पदाधिकारी बांधत आहे. करोनामुळे प्रभाग रचना जाहीर करण्यापासून विविध कामांना विलंब झाला. उशिराने प्रभाग रचनेने काम झाल्यानंतर यंदा 44 प्रभाग राहणार असून 43 प्रभागामध्ये त्रिसद्स्य तर एक प्रभाग क्रमांक आठ पंचवटी येथील प्रभागात चार सदस्य राहणार आहे. 122 नगरसेवकांवरुन 133 वर सदस्य संख्या पोहचली आहे. दरम्यान वेळेत निवडणूक होउ न शकल्याने महापालिकेच्या इतिहासात प्रथमच निवडणुका लांबल्या व प्रशासकराज आले.

ओबीसी आरक्षणामुळे राज्य मंत्रिमंडळाने निवडणूक आयोगाने प्रसिध्द केलेली प्रभागरचना रद्द झाल्याचे म्हटले. पुन्हा प्रभागरचना तयार होइल असा अंदाज अनेकांनी बांधला होता. मात्र राज्य शासनाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिल्यानंतर न्यायालयाने तत्काळ निवडणुकीची प्रक्रिया राबवण्याचे आदेश दिले. यानंतर प्रभागरचनेचे अर्धवट राहिलेले काम आयोगाने पूर्ण करत यापूर्वी प्रसिद्ध केलेल्या प्रभाग रचनांच्या हरकतींवर सुनावणी घेण्यात आली. व 17 मे रोजी अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आली.

यानंतर महापालिका निवडणुकीचे सर्व कार्यक्रम ऑगस्टमध्ये राबवले जातील व निवडणूक सप्टेंबर ते ऑक्टोंबर मध्ये जाउ शकतात. असा अंदाज बांधण्यात आला. मात्र ओबीसी आरक्षणाशिवाय नुकतेच अनुसूचित जाती, जमाती व सर्वसाधारण महिलांसाठीचे आरक्षण सोडत दादासाहेब गायकवाड सभागृहात काढण्यात आली. 133 पैकी तब्बल 67 जागांवर महिलांसाठी असणार आहे. खर्‍या अर्थाने या सोडतीपासूनच राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली.

यानंतर मात्र अचानक मतदार यादी कार्यक्रम 17 जुन रोजी प्रसिद्ध केला जाणार आहे. यामुळे अनेकजण सावध झाले आहेत. सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात निवडणूक होइल आता या भरवशावर न राहता, पुढच्या महिन्यात देखील निवडणूक जाहिर होण्याची शक्यता आहे. अशी चर्चा इच्छूकांमध्ये होत असून तयारीला लागा अशा सूचना कार्यकर्त्यांना दिल्या जात आहेत. प्रथम मागच्या महिन्यात अंतिम प्रभाग रचना जाहिर झाली,यानंतर मग मंगळवारी (दि.31) मे रोजी महिला आरक्षण सोडत काढण्यात आली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com