मनपा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क

सहा विभागांत नियंत्रण कक्ष सुरू; पावसाळ्याआधी खबरदारी
मनपा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जून महिना ( June Month ) सुरू झाला असून कधीही पाऊस कोसळण्याची शक्यता लक्षात घेऊन महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन विभाग (Municipal Disaster Management Department) सतर्क झाले असल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अशोक आत्राम यांनी दिली आहे. पावसाच्या पार्श्वभूमीवर शहरातील महापालिकेच्या सर्व सहाही विभागात याबाबतचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये पूर्व विभाग आघाडीवर आहे.

पावसाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सक्रिय झाली आहे. सहाही विभागात नियंत्रण कक्ष कार्यरत केले जाणार आहे. गोदावरी पूर वाढल्याने बाराशेहून आधीक लोक पूर्व विभागात विस्थापीत होतात. महापालिकेने बागवानपुरा शाळा, नागझरी शाळा, मानुर रोड समाजंदीर येथे पूरग्रस्तांसाठी आश्रयस्थानांची सोय केली आहे. पूरस्थितीला तोंड देण्यासाठी जेसीबी, जेट मशीन, ट्रॅक्टर, मिनी ट्रक, जीप, एक बोट, इलेक्ट्रीक जनरेटर, प्लोटींग, एक्स मेटसेट, वॉकीटॉकी, लाईप रिंग, लाईट जॅकेट, पोहोणारे, दोर, कलेक्ट्रीक बिचींग, बोल्ड कटर, जॅक, टामी, विळा, कोयता, व्हिल पाना, घन, पहार, स्टील कटर, कॉक्रीट कटर, बॅटरी, रबरी हॅण्डग्लोज, साहित्याची तयारी केली आहे.

24 तास आपत्कालीन कक्ष

नाशिक महापालिकेने आपत्कालिन परिस्थिती निर्माण झाल्यास (आग, अपघात, पुर परिस्थिती, झाडे पडणे, घर पडणे व नैसर्गिक आपत्ती) नागरिकांच्या सेवेसाठी प्रत्येक विभागात 24 तास आपत्कालिन कक्ष सुरू करण्यात आले आहे. आपत्तीजनक घटना घडल्यास त्वरीत जवळच्या आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षास माहिती कळवावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे. याबाबत विभाग निहाय हेल्पलाइन नंबर देखील जाहीर करण्यात आले आहे.

गैरसोयीची ठिकाणे

सारडा सर्कल, जिन मंजील चौक, दूध बाजार, वीर सावरकर चौक, डॉ. जाकीर हुसेन हॉस्पीटल चौक, अमरधाम रोड, संत सावतामाळी उद्यान,बनकर चौक, हरी मंजील सोसायटी, द्वारकाधीश सोसायटी, धवलगिरी गार्डन परिसर, ओमकार कॉलनी, वडाळा रोड, पखाल रोड, गणेश पार्क परिसर, लेवा समाज मंगल कार्यालय, बोधलेनगर वखार , दत्तमंदीर शिवाजीनगर, रामदास स्वामीनगर, सुर्यकलम सोसायटी, प्रभाग सोळा म्हसोबा मंदीर, जनता शाळा, तपोवन रोड, इराणी इस्टेट, वडाळा रोड, शिवाजी वाडी पूल, पूजा अपार्टमेंट, वज्रराज सोसायटी, सिटी गार्डन रोड, वडाळा चौक, आयटीआय कॉम्प्लेक्स रोड, आंबेडकरनगर स्टॉप समोर, सिध्दार्थ हॉटेल परिसर, उपनगर परिसरात वैभव कॉलनी, नळे मळा, शिव कॉलनी, श्रध्दाविहार, एचपी गॅस गोडावून, महारुद्र कॉलनी एलआयसी कॉलनी, साठेनगर, श्रीकृष्ण कॉलनी, पांडवनगरी आदीसह 60 ते 62 ठिकाणी पावसाळ्यात पूरस्थिती गंभीर होते.

आपत्कालिन कक्षाचे ठिकाण

* मुख्य आपत्ती व्यवस्थापन कक्ष, राजीव गांधी भवन, नामनपा, नाशिक :

0253-2571872, 0253-2317505

* पंचवटी विभागीय कार्यालय, मखमलाबांद नाका, पंचवटी, नाशिक :

0253-2513490

* सातपूर विभागीय कार्यालय, सातपूर, नाशिक :

0253-2350367

* नाशिक पूर्व विभागीय कार्यालय, मेनरोड, नाशिक :

0253-2504233

* नाशिक पश्चिम विभागीय कार्यालय, पंडित कॉलनी, नाशिक :

0253-2570493

* नविन नाशिक विभागीय कार्यालय, अंबड पोलिस स्टेशन समोर :

0253-2392010

* नाशिकरोड विभागीय कार्यालय, नाशिकरोड, नाशिक :

0253-2460234

मनपा अग्निशमन केंद्रे

* मुख्य अग्निशमन केंद्र, शिंगाडा तलाव, नाशिक - पुणे रोड, नाशिक

101, 0253-2590871

* पंचवटी अग्निशमन केंद्र, मखमलाबांद नाका, पंचवटी, नाशिक :

0253-2512919

* सातपूर अग्निशमन केंद्र, त्रंबकरोड, सातपूर, नाशिक :

0253-2350500

* नविन नाशिक अग्निशमन केंद्र, स्टेट बँक चौक, नविन नाशिक :

0253-2393961

* नाशिकरोड अग्निशमन केंद्र, विभागिय कार्यालय ना.रोड, नाशिक :

0253-2461379

* पंचवटी विभागिय अग्निशमन केंद्र, के.के. वाघ महाविद्यालयाजवळ, मुंबई - आग्रा महामार्ग, पंचवटी, नाशिक :

0253-2629104

मनपा रुग्णालये

* जे.डी.सी. बिटको रुग्णालय, नाशिकरोड, नाशिक :

0253-2462051

* सावित्रीबाई फुले रुग्णालय, सिन्नर फाटा, ना.रोड, नाशिक :

0253-246405403

* इंदिरा गांधी रुग्णालय, पंचवटी, नाशिक :

0253-2621331, 2512023

* गंगापूर रुग्णालय, गंगापूर गांव, नाशिक : 0253-2230029

* मायको प्रसुतिगृह, सातपूर, नाशिक : 0253-2350598

* डॉ. झाकिर हुसेन रुग्णालय, कथडा, जुने नाशिक :

0253-2590049

* श्री. स्वामी समर्थ रुग्णालय, मोरवाडी, सिडको, नविन नाशिक :

0253-2393425

* जिजामाता प्रसुतिगृह, मेनरोड, नाशिक : 0253-2597981

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com