गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची विशेष पथके

नियम मोडणार्‍यांवर दंडात्मक कारवाई
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची विशेष पथके

नाशिक । प्रतिनिधी Nashik

करोनाचा ( corona )धोका पूर्णपणे संपलेला नाही. तसेच संभाव्य तिसरी लाट येण्याची शक्यता गृहीत धरुन गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिका प्रशासन (NMC Administration) सतर्क झाले आहे. गणेशोत्सव काळात करोनाविषयक नियमांची काटेकोर अंमलबजावणी व्हावी म्हणून नियोजन करण्यात आले आहे. शहरात विनामास्क ( Without Mask ) फिरणार्‍यांवर लक्ष ठेवण्यासाठी महापालिकेने 18 पथके ( Special Squads by NMC )तयार केली आहेत. नियम मोडणार्‍यांवर दंडात्मक कारवाई होणार आहे.

सार्वजनिक गणेश मंडळांनीदेखील शक्यतो ऑनलाईन दर्शनाची सोय करुन द्यावी. याबाबतच्या लिंक शेअर कराव्यात. मंडळांनी त्यांच्या ऑनलाईन लिंक मनपाला दिल्यास मनपा प्रशासनाकडूनही त्यांच्या अधिकृत साईटवरुन त्या शेअर करण्यात येतील. दरम्यान, करोना काळात गणेशोत्सव साजरा होणार असल्याने विशेष दक्षता घेण्यात येत आहे.

सायंकाळच्या सुमारास बाहेर पडणार्‍या जे भाविकांनी मास्कचा वापर करण्यासोबतच सामाजिक अंतर ठेवावे, सॅनिटायझरचा वापर करावा. विनामास्क फिरणार्‍यांवर दंडात्मक कारवाई होणार आहे. यासाठी सर्व विभागात 18 विशेष भरारीपथके तयार करण्यात आली आहेत. एका पथकात 3 जणांचा समावेश आहे. भाविक आणि नागरिकांसह मंडळांच्या पदाधिकार्‍यांवरदेखील पथकांची नजर राहणार आहे. करोनाविषयक नियम पाळून उत्सव साजरा करावा, असे आवाहन मनपाने केले आहे.

करोनाच्या तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवासाठी महापालिकेकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. विसर्जनस्थळी गर्दी टाळण्यासाठी ऑनलाईन टाईम स्लॉट बुकिंगची सुविधा महापालिकेने गणेशभक्तांना उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेमार्फत आतापासूनच दीड, पाच, सात आणि दहा दिवसांच्या गणेश विसर्जनासाठी ऑनलाईन टाईम स्लॉट बुकींग करता येणार आहे.

महापालिकेने ‘मिशन विघ्नहर्ता’ मोहीम ( Mission Vighnaharta Campaign) हाती घेतली आहे. सार्वजनिक स्वरूपात गणेशोत्सव साजरा करण्यावर काहीशी निर्बंध लादली आहेत. गणेशमूर्तीसाठी चार फुटांचे बंधन घालण्यात आले आहे. मंडप उभारणीसाठी गणेश मंडळांना ऑनलाईन परवानगीची सुविधा यापूर्वीच देण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com