Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्यापूर्व विभाग कार्यालय नूतनीकरण साठी मनपा प्रयत्नशील

पूर्व विभाग कार्यालय नूतनीकरण साठी मनपा प्रयत्नशील

नाशिक | प्रतिनिधी Nashik

महापालिकेची ऐतिहासिक तसेच जुनी वास्तू असलेली मेन रोड (main road) येथील सध्याच्या पूर्व विभागीय कार्यालय (Eastern Divisional Office) अत्यंत धोकादायक तसेच जीर्ण अवस्थेत आला आहे.

- Advertisement -

यामुळे येथून काही भाग यापूर्वी पश्चिम विभागीय कार्यालयात (Western Divisional Offices) हलवण्यात आले आहे. मात्र सध्या ही वास्तू अत्यंत धोकादायक स्थितीत आली आहे. म्हणून या ऐतिहासिक वास्तूचे नूतनीकरण (Renovation of historical building) करण्यासाठी महापालिका प्रयत्न करीत आहे.

यासाठी सुमारे सव्वा दोन कोटी रुपये खर्च अपेक्षित असून पुढच्या समितीच्या सभेत हा विषय ठेवण्यात येणार असल्याचे समजते. मध्यंतरी नाशिक पूर्व विभागीय कार्यालयाचे (Nashik East Divisional Office) कामकाज सध्या बंद असलेल्या शालिमार (shalimar) येथील बी डी भालेकर शाळेत हलवण्यावर देखील विचार करण्यात आला होता.

शाळा (shcool) इमारत महापालिकेचे कार्यालय सुरू करण्यासाठी योग्य नसल्यामुळे त्याच्या दुरुस्तीसाठी देखील सुमारे एक कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित होता. त्याची प्रक्रिया देखील सुरू आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या बी. डी. भालेकर शाळेच्या जागेत महानगरपालिकेचे पुर्व विभागाचे कार्यालय करण्यासाठी तत्कालीन मनपा आयुक्त रमेश पवार (Municipal Commissioner Ramesh Pawar) यांनी आदेश दिले होते.

त्यानुसार पुर्व विभागाचे कार्यालय या शाळेत स्थलांतरीत करण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. इमारतीच्या दुरस्तीसाठी सुमारे एक कोटी रूपयांचा खर्च लागणार असून तसा आराखडा तयार करण्यात येत आहे. पुर्व विभागाचे कार्यालय सध्या पश्चिम व पुर्व विभागातील मनपा इमारत या दोन्ही ठिकाणी सूरू आहे. मेनरोडवर असलेली इमारतीचा काही भाग कोसळला असल्याने या कार्यालयाचे कामकाज दोन ठिकाणी सुरू आहे.

दरम्यान महापालिका आता सव्वा दोन कोटी रुपये खर्च करून मेन रोड येथील ऐतिहासिक इमारतीचे नूतनीकरण करणार आहे. अनेक वेळा यासाठी प्रयत्न करण्यात आले होते, आता महापालिकेत प्रशासकीय राजवट सुरू असून महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार (Commissioner and Administrator Dr. Chandrakant Pulkundwar) हे कायद्यानुसार नियमित महासभा तसेच स्थायी समितीच्या सभा घेत आहे. त्यामुळे मेन रोडवरील या ऐतिहासिक इमारत नूतनीकरणाच (Building renovation) प्रस्ताव तयार करण्यात येत असून पुढच्या सभेत तो ठेवण्यात येणार असल्याचे समजते.

अतिक्रमण काढा

नाशिक शहरत अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. महापालिकेचे अतिक्रमण विभाग पाहिजे त्या प्रमाणात कारवाई करीत नसल्यामुळे अतिक्रमणधारकांचे मनोबल वाढले आहे. त्यातच मेन रोड भागात पायी चालायला देखील जागा मिळत नाही तर दुसरीकडे महापालिकेचे कार्यालय देखील चोहोबाजूंनी अतिक्रमणाने घेरले गेले आहे. या ठिकाणी कडक अतिक्रमण मोहीम राबवावी तसेच पुन्हा अतिक्रमण होणार नाही यासाठी नियोजन करावे, अशी मागणी नागरिक करत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या