थकबाकीदारांवर महापालिकेची धडक कारवाई

थकबाकीदारांवर महापालिकेची धडक कारवाई

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

चालू आर्थिक वर्षासाठी (financial year) मनपा आयुक्तांनी (Commissioner) पाणीपट्टीपोटी 75 कोटी रुपये वसुलीचे उद्दिष्ट दिले आहे. मात्र, उद्दिष्टापैकी आतापर्यंत गेल्या 10 महिन्यांत केवळ 45 कोटींची पाणीपट्टी वसूल करता आली आहे. आर्थिक वर्ष संपण्यास दोन महिन्यांचा कालावधी असल्याने या दोन महिन्यांत 30 कोटी रुपये वसूल करण्यासाठी मनपाच्या विविध कर आकारणी (taxation) विभागांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

त्यामुळे वसूली मोहीम कडक करण्यात आलेली आहे. त्याचाच एक भाग म्हणून पाणीपट्टीची थकबाकी असलेल्या थकबाकीदारांना नोटिसा पाठवण्यात येऊन थकबाकी वसुलीकरता (recovery) आवाहन केले जात आहे. थकबाकी न देणार्‍यांचे नळ कनेक्शन (connection) तोडण्यात येत आहेत. 

नाशिक महानगरपालिकेच्या (Nashik Municipal Corporation) माध्यमातून शहर परिसरातील पाणीपट्टी थकबाकीदारांबाबत गेल्या पंधरा दिवसांपासून कर विभागाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहीमेत आतापर्यंत 3 हजार 260 घरांना भेटी देण्यात आल्या आहेत. कर आकारणी विभागाने नोटीस बजावल्यानंतरही पाणीपट्टीची थकबाकी न भरणार्‍या 333 मालमत्ताधारकांचे नळकनेक्शन नाशिक महापालिकेकडून तोडण्यात आले आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com