
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
स्वच्छ भारत अभियानांतर्गत (Swachh Bharat Mission) नाशिक (nashik) हा अग्रस्थानावर येण्यासाठी मनपा प्रशासनाने कंबर कसली आहे.
येणार्या काळात यासाठी अॅक्शन प्लॅन (Action Plan) तयार करण्यात आला असून मनपा (Municipal Commissioner) आयुक्तांच्या नेतृत्वाखाली विविध बैठकांचा आयोजन त्यासाठी करण्यात येणार आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून स्वच्छ भारत अभियांनात (Swachh Bharat Abhiyan) सहभागासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र नागरीकांच्या सहभागाअभावी नाशिकचा (nashik) क्रमांक मागे पडत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यासाठी शहराची स्वच्छता ही केवळ मनपाच्या आरोग्य कर्मचार्यांच्या भरोशावर होणार नसून, यासाठी नागरिकांचाही सहभाग तितकाच महत्त्वाचा व मोलाचा आहे ही बाब अधोरेखित करीत मनपा आयुक्तांनी शहरातील विविध संघटनांना एकत्रित करून यावर मंथन करण्याचा निर्णय घेतला आहे.
या उपक्रमांतर्गत शहरातील व्यापारी वर्गांची स्वतंत्र बैठक घेऊन त्यांच्या व्यवसायाच्या ठिकाणच्या कचर्याचे नियोजन कसे करावें व तो परिसर स्वच्छ राहण्यासाठी काय करायचं याबाबत चर्चा केली जाणार आहे. त्या पाठोपाठ शहरातील विविध सामाजिक संंघटनांना (social organizations) (एनजीओ) बोलावून त्यांनाही याबाबत समाज प्रबोधनासाठी पूढे येण्याचे आवाहन करर्यात येणार आहे.
त्याच सोबत विविध हौसिंग सोसायटी (Housing Society), गृहनिर्माण संस्था व शेवटी सर्वसामान्य नागरिक यांच्याशी विभागीय कार्यालयाच्या स्तरावर बैठका घेऊन कचर्याचे संकलन, कचर्याची विल्हेवाट (Waste disposal), विभागात साचणारे ब्लॅकस्पॉट याबाबत चर्चा करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. या माध्यमातून नागरिकांचा सहभाग घेण्यासोबतच शहराला स्वच्छ करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यातूनच शहर स्वच्छ होण्यास मदत होईल असा विश्वास मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार (Municipal Commissioner and Administrator Dr. Chandrakant Pulkundwar) यांनी व्यक्त केला.