बांधकाम परवानगीसाठी मनपा आयुक्तांनी घेतला 'हा' निर्णय

बांधकाम परवानगीसाठी मनपा आयुक्तांनी घेतला 'हा' निर्णय

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक महापालिकेच्या नगररचना विभागात सुलभीकरण व्हावे, याकरिता मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार ( NMC Commissioner Dr. chandrakant Pulkundvar ) यांनी क्रेडाई आणि नरेडको (CREDAI & NAREDCO ) या संघटनाबरोबर बैठक घेतली. यावेळी आयुक्ताकडे झालेल्या चर्चेमध्ये दोन्ही संघटनेतील सदस्यांनी महापालिकेच्या नगरनियोजन विभागातील विविध परवानग्यांचे सुलभीकरण करण्याची मागणी करण्यात आली. त्यानुसार चार सदस्यांची समिती गठीत करण्यात आली आहे.

नगररचना विभागात ( Department of Urban Planning)विविध परवानग्या घेण्यासाठी येणार्‍यांना पालिकेत चकरा मारण्याची आवश्यक्यता लागू नये, यासाठी चार अधिकार्‍यांची समिती गठीत करण्यात आली आहे. ही समिती राज्यातील काही महापालिकांमध्ये सुरु असलेल्या कार्यपद्धतीची माहिती समिती घेणार आहे, अशी माहिती मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिली.

समिती अभ्यास करून महिन्याभरात अहवाल सादर करणार आहे. समिती राज्यातील ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, नागपूर, औरंंगाबाद या महापालिकेतील नगररचना विभागाच्या कार्यपध्दतींचा अभ्यास करून अहवाल तयार करतील. व त्या अनुषंगाने नाशिक महापालिकेतील कार्यपध्दतीमध्ये काय सुधारणा करता येतील, या अनुषंगाने शिफारशीसह अहवाल सादर करणार आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com