Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्यामनपा आयुक्तांनी बांधकाम विभागाला दिले 'हे' महत्वाचे आदेश

मनपा आयुक्तांनी बांधकाम विभागाला दिले ‘हे’ महत्वाचे आदेश

नाशिक । प्रतिनिधी Nashik

मागील दोन महिन्यांपासून नाशिक शहर परिसरात सतत पावसाचा( Rain ) जोर कायम आहे. मात्र, मागील काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्यामुळे महापालिका प्रशासनाच्या वतीने त्वरित शहरातील खड्डे बुजवण्याचे काम सुरू झाले आहे. तर दुसरीकडे डांबरीकरणदेखील होत आहे. दरम्यान, कामाची गुणवत्ता तपासून बांधकाम विभागाने एक महिन्याच्या आत नाशिक शहर खड्डेमुक्त करावे, असे आदेश महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिले आहेत.

- Advertisement -

पश्चिम विभागातील तिरुपती टाऊन चौकातील खड्डे स्क्रॅप आणि खडीकरण करून डांबरीकरण करण्याचे काम करण्यात आले. तर पंडित कॉलनीजवळील हॉटेल पतंग चौकात शरणपूररोडवर डांबरीकरण पॅचचे काम होत आहे. गंगापूर रोडवर शहीद सर्कल येथेही डब्लूबीएम मटेरीअलने खड्डे बुजवण्यात आले आहेत.

नाशिकरोड विभागात पुणे महामार्गावर दत्तमंदिर चौकात बीएम मटेरिअलच्या सहाय्याने खड्डे बुजवण्यात येऊन पॅचवर्क करण्यात आले. याच विभागातील देवळाली कॅम्प, लॅमरोड मार्गावरील खड्डे बीएम मटेरिअलने बुजवण्यात आले आहेत. वडाळा-पाथर्डी रोडवर प्रभाग 30 मध्ये खड्डे बुजवण्यात आले. या प्रभागातील कलानगर तसेच समर्थ स्विट रोड, पांडवनगरी येथे रस्ता दुरुस्ती करण्यात आली. प्रभाक 31 समर्थनगर तसेच नवीन नाशिक विभागातील प्रभाग 24 लेखानगर रणगाडा ते जुनी स्टेट बँक रोडवरील खड्डे बुजवण्यात आले आहेत.

किनारा हॉटेल रोड, नासर्डी नदी, प्रभाग 15 येथे रस्त्यालगतचा गाळ काढून जीएसबी मटेरिअलने रोड साईडचे काम करण्यात आले. तसेच तपोवन रोड, जुना सायखेडा रोड, विजय-ममता ते टाकळी, प्रभाग 16 मध्येही खड्डे बुजवण्यात आले आहेत. प्रभाग क्रमांक आणि सहामधील पेठरोड आरटीओ कॉर्नर ते राऊ हॉटेल मार्गावरील खड्डे बीबीएम मटेरिअलने बुजवण्यात आले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या