मनपा बससेवेचा आज लोकार्पण सोहळा

मनपा बससेवेचा आज लोकार्पण सोहळा

नाशिक । प्रतिनिधी Nashik

करोना( Corona ) नियमांचे पालन करीत नाशिक शहर बससेवेचा( NMC - Nashik City bus services ) आज (दि.8)लोकार्पण सोहळा होत आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ व महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर सतिष कुलकर्णी राहणार आहे.

आज गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजता शालिमार येथील कालिदास कला मंदिर या ठिकाणी सोहळा होणार आहे.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, कृषी मंत्री दादा भुसे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्यासह खा. हेमंत गोडसे, माजी पालकमंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे नाशिक संपर्क मंत्री जयकुमार रावल, खा.डॉ. भारती पवार आ. देवयानी फरांदे, आ. सीमा हिरे, आ. राहुल ढिकले, आ. सरोज आहेर उपस्थित राहणार आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com