Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यामुंबईचा दिल्लीवर विजय

मुंबईचा दिल्लीवर विजय

दुबई | वृत्तसंस्था

मुंबई इंडियन्स व दिल्ली कॅपिटल्स विरुध्द झालेल्या सामन्यात मुंबई च्या संघाने दिल्लीचा दणदणीत पराभव केला. मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या सामन्यात सहाव्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

- Advertisement -

नाणेफेक जिंकून दिल्लीने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मुंबईचा कर्णधार रोहित पहिल्याच चेंडूवर पायचीत झाला. डी कॉक-सूर्यकुमार यादव जोडीने चांगली भागीदारी केली. क्विंटन डी कॉक ४० धावांवर बाद झाला. त्याने ५ चौकार आणि १ षटकार लगावले.

सूर्यकुमार यादव अर्धशतकानंतर धावांवर माघारी परतला. कायरन पोलार्ड (०), कृणाल पांड्या (१३) देखील लवकर बाद झाले. त्यानंतर इशान किशन-हार्दिक पांड्या जोडीने तुफान फटकेबाजी करत मुंबईच्या संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली. हार्दिकने १४ चेंडूत नाबाद ३७ धावा केल्या.तर किशनने ३० चेंडूत नाबाद ५५ धावा केल्या.

इशान किशन ५५, सूर्यकुमार यादव ५१ आणि हार्दिक पांड्या ३७ यांच्या फटकेबाजीच्या जोरावर मुंबईने २०० धावांपर्यंत मजल मारली.

मुंबई विरुध्द दिल्ली च्या धडाकेबाज सामन्यात मुंबईच्या संघाने दिल्लीला दिलेल्या २०१ धावांचे आव्हान दिल्लीचा संघ पूर्ण करू शकला नाही दिल्लीच्या फलंदाजी करणाऱ्या खेळाडूंना पहिल्याच षटकात दोन धक्के बसले. पृथ्वी शॉ आणि अजिंक्य रहाणे दोघेही शून्यावर माघारी परतले. दमदार फॉर्मात असलेला शिखर धवनही शून्यावर बाद झाला.

दिल्लीची अवस्था शून्य धावांवर ३ गडी बाद अशी झाली. कर्णधार श्रेयस अय्यर (१२) आणि ऋषभ पंत (३) देखील लवकरच माघारी परतले. त्यानंतर मार्कस स्टॉयनीस आणि अक्षर पटेल जोडीने काही काळ संघर्ष केला. स्टॉयनीसने लढाऊ वृत्ती दाखवत ४६ चेंडूत ६५ धावांची खेळी केली. अखेर दिल्लीचा संघ १४३ धावांपर्यंतच मजल मारू शकला .

- Advertisment -

ताज्या बातम्या