Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रVada Pav : जगातील सर्वोत्तम सँडविचेसच्या यादीत 'वडापाव'चा समावेश

Vada Pav : जगातील सर्वोत्तम सँडविचेसच्या यादीत ‘वडापाव’चा समावेश

मुंबई | Mumbai

मुंबईमध्ये सर्वात प्रसिद्ध स्ट्रीट फूड म्हणजे वडापाव (Vad Pav). मुंबईकरांचं आणि वडापावचं नातं अगदी वेगळंच आहे. आनंदाच्या क्षणी असो वा दुखाच्या क्षणी, पोटाची भूक भागवण्याचा उत्तम आधार म्हणजे वडापाव. आज जगभरामध्ये वडापाव पोहचला आहे. याच वडापावच्या शिरपेचात मोठा मानाचा तुरा रोवणारी बातमी सध्या समोर येत आहे.

- Advertisement -

जगभरातील पारंपारिक खाद्यपदार्थांसाठी TasteAtlas नावाचे एक प्रायोगिक प्रवास मार्गदर्शक (Experiential Travel Guide) आहे, जे अस्सल जुन्या पाककृती, खाद्य समीक्षक पुनरावलोकने आणि लोकप्रिय पदार्थ व पदार्थांबद्दल संशोधन लेख एकत्र करते. आता TasteAtlas ने ‘जगातील सर्वोत्तम 50 सँडविच’च्या यादीमध्ये वडापावला स्थान दिले आहे.

Watermelon : लालेलाल-रवाळ कलिंगड कसं निवडाल? सोप्या टिप्स जाणून घ्या…

या यादीमध्ये मुंबई किंवा महाराष्ट्रातील वडापाव चक्क 13व्या क्रमांकावर आहे, जे एक उत्तम जागतिक रँकिंग आहे. या यादीमध्ये तुर्कीचा टॉम्बिक प्रथम क्रमांकावर आहे, त्यानंतर दक्षिण अमेरिकेतील पेरूचा बुटीफारा आणि तिसरा क्रमांक अर्जेंटिनाचा सँडविच डी लोमोला मिळाला आहे. या यादीमध्ये केवळ दोन शाकाहारी सँडविचचा समावेश आहे. ज्यातील एक आहे अवाकाडो टोस्ट आणि दुसरा म्हणजे वडापाव.

Accident : वाढदिवच्या सिलिब्रेशनला गेले ते परतलेच नाही; भीषण अपघातात ६ मित्रांचा जागीच मृत्यू

वडापावचा जन्म 1966 साली दादर स्टेशन बाहेरील अशोक वैद्य यांच्या खाद्यगाडीवर झाला. याच दरम्यान, दादर मधील सुधाकर म्हात्रे यांनी वडापावची सुरुवात केली. 1970 ते 1980 च्या काळात मुंबईमध्ये मिल बंद झाल्या. त्यानंतर अनेक युवकांनी रोजगाराचे साधन म्हणून वडापावच्या गाड्या सुरु केल्या.

Rahul Kalate : असं कसं झालं? ४४ हजार मतं घेऊनही राहुल कलाटे यांचं डिपॉझिट जप्त

त्यानंतर मुंबईच्या गल्लीगल्लीत वडापावच्या गाड्या दिसू लागल्या. यादरम्यान शिवसेनेने मुंबईतील दक्षिण भारतीयांविरुद्ध आंदोलन छेडले. याचाच एक भाग म्हणून काही शिवसैनिकांनी दक्षिण भारतीय पदार्थ सोडून वडापाव खाण्यास सुरुवात केली. मुंबईतील दादर, लालबाग, परेल आणि गिरगांव येथील मिल मजूरांमुळे खरंतर वडापावला लोकप्रियता मिळाली.

कसब्याच्या निकालावर शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “देशभरातील आगामी निवडणुकांमध्ये…”

- Advertisment -

ताज्या बातम्या