Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यामुंबईच्या नामांकित हॉटेलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी

मुंबईच्या नामांकित हॉटेलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी

मुंबई | Mumbai

रायगड जिल्ह्यातील (Raigad District) हरिहरेश्वरमध्ये संशयास्पद बोटी सापडल्यानंतर सर्व यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. आता मुंबईमधील (Mumbai) नामांकित ललित हॉटेलला (Lalit Hotel) बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आल्याचे समजते…

- Advertisement -

मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) वाहतूक शाखेला याबाबत धमकीचे मेसेज पाठवण्यात आला. यामुळे मुंबईचे चांगलेच टेन्शन वाढले आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये धमकीचे सत्र सुरू आहे.

बंदुकीचा धाक दाखवत लुटली २५ किलो चांदी

आता मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर एक धमकीचा मेसेज मिळाला आहे. यामध्ये मुंबईतील प्रसिद्ध ललित हॉटेलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे.

नाशकात श्रावण सरींची जोरदार बरसात

एका अज्ञात व्यक्तीने हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवला असल्याचे फोन करून सांगितले, त्यामुळे एकच खळबळ उडाली. हॉटेलमध्ये चार ठिकाणी बॉम्ब ठेवले आहे. जर बॉम्बचा स्फोट घडवायचा नसेल तर 5 कोटींची खंडणी मागण्यात आली आहे. या प्रकरणी सहार पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या