Mumbai Sakinaka Rape : मुंबईतील निर्भयाची मृत्यूशी झुंज अपयशी, उपचारादरम्यान मृत्यू

Mumbai Sakinaka Rape : मुंबईतील निर्भयाची मृत्यूशी झुंज अपयशी, उपचारादरम्यान मृत्यू

मुंबई (Mumbai)

मुंबईतील (Mumbai) अंधेरी परिसरातील साकीनाका येथे अत्याचार (Sakinaka Rape Case) झालेल्या त्या पीडित महिलेची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली आहे. पीडित महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. (Sakianaka rape case)

महिलेवर अत्याचार करण्यात आल्यानंतर गुप्तांगात रॉड घुसवल्याचा अमानवीय प्रकार समोर आला होता. या घटनेमुळे खळबळ माजली होती. जखमी अवस्थेत महिलेला उपचारासाठी घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र मृत्यूशी तिची झुंज अपयशी ठरली आहे. या घटनेवरुन संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त होत असून पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. (mumbai rape victim latest news)

दरम्यान महिलेचा दुर्देवी मृत्यू झाल्यानंतर भाजप (BJP) नेत्या चित्रा किशोर वाघ (Chitra Kishor Wagh) यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विट करत आपला राग व्यक्त केला. 'साकीनाका पिडीतेची मृत्युशी झुंज अपयशी ठरली. माफ कर ताई आम्हाला कुठल्या वेदनेतून गेली असशील याची कल्पनाही करवत नाही. पण, या मुर्दाड सरकार व व्यवस्थेला याचं घेणंदेणं नाही, त्यांच्यासाठी तूझा मृत्यू म्हणजे फक्त अजून १ नंबर लाज वाटते सावित्रीच्या लेकी म्हणवून घेतांना. नाही वाचवू शकलो तुला'

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com