
मुंबई | Mumbai
मुंबई-पुणे महामार्गावर (Mumbai-Pune Expressway) गॅस टँकर (Gas Tanker) उलटून झालेल्या विचित्र अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातामुळं मुंबई आणि पुणे महामार्गावरील वाहतूक मंदावली आहे.
अपघातग्रस्त टँकर पुण्याहून मुंबईकडे जात होता. खोपोली एक्झिट जवळ उतारावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटला त्यामुळे टँकर पुणे लेन वर येऊन उलटला. यावेळी टँकरला ती गाड्या धडकल्याने भीषण अपघात घडला ज्यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला.