Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्या७२ तास चकवा देणाऱ्या अनिल जयसिंघानीला कशी झाली अटक? पोलिसांनी सांगितला संपूर्ण...

७२ तास चकवा देणाऱ्या अनिल जयसिंघानीला कशी झाली अटक? पोलिसांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम

मुंबई | Mumbai

अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) लाच (Bribe) प्रकरणात आरोपी असलेल्या अनिक्षा जयसिंघानी हिचे वडील अनिल जयसिघांनी याला गुजरातमध्ये पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या ७२ तासांपासून अनिल जयसिंघानी पोलिसांना चकवा देत होता. त्यानंतर जयसिंघानीच्या शोधासाठी पोलिसांची ५ पथके तैनात करण्यात आली होती. यानंतर गुजरातमध्ये सापळा रचून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. त्यानंतर आता पोलिसांनी (Police) त्याला पकडताना काय काय अडचणी आल्या व तो ७२ तास कसा चकवा देत होता? हे पत्रकार परिषदेत सांगितले आहे…

- Advertisement -

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अनिल जयसिंघानी (Anil Jaisinghani) हा महाराष्ट्रातल्या शिर्डीतून गुजरातला गेला. त्यानंतर बार्डोली या ठिकाणी अनिल जयसिंघांनी होता. आम्ही तीन पथके गुजरात राज्यात पाठवली. गुजरात (Gujarat) राज्यातल्या सुरत (Surat) पोलिसांनी, सुरत ग्रामीण पोलीस तसेच गोध्रा आणि इतर पोलिसांची मदत घेऊन अनिल जयसिंघांनीला पकडण्याची मोहीम राबवली. अनिल जयसिंघानी हा ७२ तास पोलिसांना चकवा देत होता.

नाशिकच्या ट्रेकरचा माळशेज घाट परिसरात मृत्यू

तसेच बार्डोलीत त्याला पकडण्यासाठी सापळा रचला. तिथून तो निसटला. त्यानंतर तो सुरतला गेला. सुरतहूनही तो पळाला. त्यानंतर वडोदरा, भरूच या मार्गे गोध्रा या ठिकाणी पळून जात असताना त्याला ड्रायव्हर आणि एका नातेवाईकासह अटक करण्यात आली, अशी माहिती पोलिसांनी दिली. यावेळी जयसिंघानी याच्याकडे वेगवेगळ्या कंपन्यांचे डिव्हाइसेस आणि इंटरनेट वापरण्यासाठी असणारी विविध यंत्रणाही जप्त करण्यात आली आहे. तर अनिल जयसिंघानी हा लोकेशन लपवण्यात आणि पोलिसांना गुंगारा देण्यात तरबेज असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) दिली.

सुषमा अंधारेंनी उडवली मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ विधानाची खिल्ली; म्हणाल्या…

दरम्यान, अनिल जयसिंघानीला पुढील तपासासाठी मलबार हिल पोलिसांच्या (Malabar Hill Police) ताब्यात देण्यात आले असून आरोपीवर आतापर्यंत १४-१५ गुन्हे दाखल आहेत. तसेच आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष ऑपरेशन राबवले. तर याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या