मुंबईला बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा अटकेत, मध्यरात्री कारवाई

मुंबईला बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा अटकेत, मध्यरात्री कारवाई

मुंबई | Mumbai

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बॉम्बस्फोट करण्याची धमकी दिली जात आहे. मंगळवारी ट्विटरच्या माध्यमातून बॉम्बहल्ल्याची धमकी देणाऱ्या १९ वर्षीय तरुणाला मुंबई पोलिसांनी नांदेडमधून अटक केली. श्रीपाद गोरठकर असं या तरुणाच नाव आहे.

श्रीपाद गोरठकर असे धमकी देणाऱ्या माथेफिरू तरुणाचे नाव आहे. तो मूळचा नायगाव तालुक्यातील नावंदी येथील राहणारा आहे. तो नांदेड येथे शिक्षण घेत आहे. याबाबत चौकशी केली असता बी. कॉम. द्वितीय वर्षात शिकत असल्याचे सांगितले.

मुंबईला बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा अटकेत, मध्यरात्री कारवाई
धक्कादायक! शूटिंग संपवून परतत असताना ट्रकने चिरडले, प्रसिद्ध अभिनेत्रीचा जागीच मृत्यू

मानसिक तणावाखाली येऊन असा प्रकार केल्याचे सांगितले आहे. श्रीपाद गोरठकर हा सर्वसामान्य कुटुंबातील असून वडील कमलाकर गोरठकर हे गडगा येथे मेडिकल चालवतात. दरम्यान आरोपीने धमकीचा हा मेसेज इंग्रजीत लिहिला होता. 'I M Gonna Blast The Mumbai Very Soon' असे ट्विटरवर लिहिण्यात आले होते.

पोलिसांनी ही घटना गांभीर्याने घेत या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. हा मेसेज कुणी पाठवला, तसेच कोठून आला या बाबत चौकशी सुरू करण्यात आली होती. मुंबईच्या सीआययू युनिटने तात्काळ कारवाई करत मॅसेज पाठवणाऱ्या तरुणाचा शोध घेतला. तपासात हा तरुण जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील नावंदी येथील रहिवासी असल्याची माहिती मिळाली.

मुंबईला बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा अटकेत, मध्यरात्री कारवाई
Sameer Wankhede : ...तर माझाही आतिक अहमद होऊ शकतो;समीर वानखेडेंनी व्यक्त केली भीती

मुंबई पोलिसांनी तात्काळ नांदेडचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांना याबाबत माहिती दिली. सोमवारी रात्री २ वाजता मुंबई क्राईम ब्रँचने नायगाव पोलिसांच्या मदतीने या तरुणाला त्याच्या घरून अटक केली. त्याची प्राथमिक चौकशी करून त्याला मुंबईत आणण्यात आले आहे.

दुसरीकडे, रविवारी २१ मे रोजी एका व्यक्तीने मुंबई पोलिसांना फोन करून २६/११ हल्ल्याप्रमाणे शहरात हल्ला केला जाणार असल्याचं सांगितलं. पोलिसांना हा संशयास्पद कॉल राजस्थानमधून आला होता, त्यानंतर राजस्थान पोलिसांना याची माहिती देण्यात आली. या प्रकरणावर तत्काळ कारवाई करत राजस्थान पोलिसांनी आरोपीला अटक केली होती.

मुंबईला बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा अटकेत, मध्यरात्री कारवाई
शुद्धीकरणाचे लोण आता कर्नाटकमध्ये, काँग्रेस कार्यकर्त्यांनी थेट विधानसभा परिसरात शिंपडलं गोमूत्र... Video व्हायरल!
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com