आपत्ती व्यवस्थापनासाठी मनपात मुंबई पॅटर्न

अधिकार्‍यांचे शिष्टमंडळ आज मुंबईत
आपत्ती व्यवस्थापनासाठी मनपात मुंबई पॅटर्न

नाशिक । प्रतिनिधी Nashik

राज्यात नाशिक, नागपूर आणि औरंगाबाद महापालिकेत ( Nashik, Nagpur, Aurangabad Municipal Corporation ) अद्यावत आपत्ती नियंत्रण कक्ष (Disaster control rooms )स्थापन करण्यात येणार आहे. केंद्रीय आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या मदतीने राज्यातील तीनमहापालिकांमध्ये यंदापासून आपत्ती नियंत्रण कक्ष सुरु होईल. महापालिकेतील चार वरिष्ठ आधिकार्‍यांना मुंबईत प्रशिक्षण दिले जाणार आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समन्वयक मुद्दसर यांनी ही माहीती दिली.

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पुढाकाराने राज्यात तीन शहरांत कक्ष कार्यान्वीत होणार आहे. त्यात, पुर्वपावसाळी कामाचा भाग म्हणून नियंत्रण कक्षातून आपत्ती काळात कसे कामकाज करायचे याचे शास्त्रोक्त पध्दतीने प्रशिक्षण दिले जाणार आहे.

महापालिका आयुक्त रमेश पवार यांनी पुढाकार घेत, महापालिकेतील अभियंता शिवकुमार वंजारी, हर्षल बावीस्कर, अग्निशमन दलाचे संजय बैरागी आणि शिवाजी चव्हाणके अशा चार अधिकार्‍यांना शास्त्रोक्त पध्दतीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यानंतर त्यांनी नाशिकला येउन आधिकारी कर्मचार्‍यांसह नियंत्रण कक्ष अद्यावत करायचा आहे.

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे (युएनडीपी) तर्फे राज्यातील तीन शहरासाठी ही सोय केली जाणार आहे. डिझास्टर रिस्क मॅनेजमेंट साठी नागपूर, नाशिक आणि औरंगाबाद या प्रमुख तीन शहरांची निवड करण्यात आली आहे.

त्यात, शहरातील आपत्ती व्यवस्थापनाशिवाय शाळांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात आले आहे.त्याअतर्गंत नाशिकमधील 50 शाळांचा सुरक्षा आराखडा तयार केला जाणार आहे. आपत्तकालीन स्थितीत उपाययोजना, विद्यार्थ्यांना प्रशिक्षण, जोखीचे मूल्यमापन याविषयी माहीती दिली जाईल. त्यासाठी मुंबई महापालिकेतील तसेच आपत्ती व्यवस्थापन विभागातील प्रशिक्षण केंद्रात त्याचे सविस्तर प्रशिक्षण दिले जाणार आहे.

Related Stories

No stories found.