एनसीबीचे पथक जळगावात : १५०० किलो गांजा जप्त

एनसीबीचे पथक जळगावात : १५०० किलो गांजा जप्त

राज्यात चर्चेत असलेले ड्रग्ज प्रकरण आता जळगाव (jalgaon)जिल्ह्यात पोहचले आहे. एनसीबीचे (ncb) पथक थेट जळगाव जिल्ह्यात दाखल झाले असून तब्बल १५०० किलो गांजा जप्त केल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे. जळगाव जिल्ह्यातील एरंडोल (erandol)येथे ही कारवाई करण्यात आली.

एनसीबीच्या (ncb)पथकाला खबऱ्याकडून टीप मिळाल्यानंतर पोलिसांनी ट्रकमधून वाहतूक करणाऱ्यात येत असलेला गांजा पकडला आहे. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले असून ते आंध्र प्रदेशातील आहेत.

एनसीबीचे पथक जळगावात : १५०० किलो गांजा जप्त
सलमानने सांगितले, त्याची कोट्यावधीची मालमत्ता कोणाला देणार?

आंध्र प्रदेशच्या विखाशापट्टणम येथून हा गांजा विक्रीसाठी महाराष्ट्रात आणण्यात आला होता. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच, त्यांनी धाड टाकून गांजाची पोती ताब्यात घेतली आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com