Monday, April 29, 2024
HomeUncategorizedमुंबईत मिनी लॉकडाऊनचे संकेत

मुंबईत मिनी लॉकडाऊनचे संकेत

मुंबईत कोरोनाच्या वाढत्या आकड्याने धडकी भरवली आहे. मुंबईत कोरोनाची (corona) दैनंदिन रुग्णसंख्या २० हजारापर्यंत गेली तर लॉकडाऊनचा विचार करावा लागले, असं मुंबईच्या महापौरा किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांनी म्हटलं होतं. गुरुवारी मुंबईत २० हजाराहून अधिक रुग्णांची नोंद झाली. या पार्श्वभूमीवर बोलताना आज महापौरांनी मिनी लॉकडाऊनचे (Mini Lockdown) संकेत दिले आहेत. विंकएन्ड लॉकडाऊन सर्वांना पवडण्यासारखे असल्याचे त्या म्हणाल्या.

नाशिकमधील सर्व शाळा सोमवारपासून बंद : वाचा काय आहेत निर्बंध ?

- Advertisement -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री आणि शरत पवार याबाबतचा निर्णय घेतील. मुंबईतील निर्बंधाबाबत आज संध्याकाळी ७ वाजेपर्यंत निर्णय जाहीर होऊ शकतो असं महापौर पेडणेकर यांनी म्हटलं आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे मिनी लॉकडाऊन लावणं परवडणार आहे, असं महापौर पेडणेकर यांनी स्पष्ट केलं आहे. त्या म्हणाल्या, “ निर्बंधामध्ये वाढ होऊ शकते. सौम्य लक्षणांची रुग्णसंख्या बरीच आहे. धोक्याची पातळी ओलांडल्यानंतर धावपळ उडेल, ही धावपळ वेळीच रोखली जावी, यासाठी प्रयत्न केले जात आहे. सध्यातरी पूर्ण लॉकडाऊन लागू केला जाणार नसून मिनी लॉकडाऊनवर विचार केला जात आहे. ”

- Advertisment -

ताज्या बातम्या