Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्यापंचवटी एक्स्प्रेस पहिल्याच दिवशी धावली भरघोस प्रतिसादात

पंचवटी एक्स्प्रेस पहिल्याच दिवशी धावली भरघोस प्रतिसादात

नाशिकरोड | प्रतिनिधी

लॉकडाऊन काळात शासनाच्या निर्देशाप्रमाणे बंद असलेली रेल्वेसेवा सुरळीत करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या आदेशानुसार आजपासून मनमाड-मुंबई विशेष रेल्वे आजपासून झाली. जवळपास आज ६० टक्क्यांपेक्षा अधिक प्रवाशी घेऊन पंचवटी एक्स्प्रेसने मुंबईकडे प्रयाण केले.

- Advertisement -

ट्रेन सुरु झाल्यामुळे चाकरमान्यांनी समाधान व्यक्त केले आहे. मात्र, पास सुरु करण्यात यावेत अशी मागणी दररोज कामानिमित मुंबई गाठणाऱ्या नाशिकसह पंचक्रोशीतील नागरिकांनी व्यक्त केली आहे.

आज एकूण 80 विशेष रेल्वेगाड्या देशभरात सुरू झाल्या. प्रवाशांना गाडी सुटण्याच्या आधी नव्वद मिनीटे अगोदर येण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. त्यानुसार मनमाडसह नाशिकरोडपरिसरात मोठी गर्दी प्रवाशांनी केलेली दिसून आली.

येऊनजाऊन तीन तासापेक्षा अधिक वेळ रेल्वे स्टेशन परिसरात जाणार असल्यामुळे काहीशी नाराजी व्यक्त केली जात आहे.

करोनाची लक्षणे नसलेल्या प्रवाशांना प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली. प्रवासापूर्वी थर्मल स्क्रिनिंग करण्यात आले. करोनाबाबतचे निकष, नियम यांचे पालन करावे लागेल. केवळ आरक्षण तिकिट असलेल्या प्रवाशांना प्रवास करता येईल. प्रतिक्षा यादीतील प्रवाशांना परवानगी नाकारण्यात आली. प्रवाशांना फेस मास्क अनिवार्य करण्यात आले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या