Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यामुंबई इंडियन्सचा सनराइजर्स हैदराबादवर विजय

मुंबई इंडियन्सचा सनराइजर्स हैदराबादवर विजय

शारजा । वृत्तसंस्था

शारजाच्या मैदानावर झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने सनराईजर्स हैदराबादवर ३४ धावांनी मात केली.

- Advertisement -

शारजामधील लहान मैदानाचा चांगला वापर करत मुंबईच्या फलंदाजांनी फटकेबाजी करत मुंबईने २०८ धावांचा टप्पा गाठला .मुंबई इंडियन्सची सुरुवात चांगली झाली नाही. संदीप शर्माच्या पहिल्याच षटकात षटकार मारणारा कर्णधार रोहित शर्मा लगेचच झेलबाद झाला. यानंतर सूर्यकुमार यादव आणि क्विंटन डी-कॉक यांनी छोटेखानी भागीदारी करत संघाचा डाव सावरला.

हेंद्राबादच्या संघाला २०९ धावांचं आव्हान होते , परंतु हैदराबादचा संघ १७४ धावांपर्यंतच मजल मारु शकला. हैदराबादकडून कर्णधार डेव्हिड वॉर्नरने ६० धावांची खेळी करत आक्रमक खेळी केली. मुंबईच्या गोलंदाजांनीही हैदराबादला फार टिकण्याची संधी दिली नाही.

जॉनी बेअरस्टो आणि डेव्हिड वॉर्नर जोडीने हैदराबादच्या डावाची चांगली सुरुवात केली. ट्रेंट बोल्टने बेअरस्टोला माघारी धाडत मुंबईला पहिलं यश मिळवून दिलं.

यानंतर मनिष पांडे आणि वॉर्नर यांनी पुन्हा एकदा भागीदारी करत संघाचा डाव सावरला. ही जोडी मैदानात स्थिरावणार असं वाटत असतानाच मनिष पांडे जेम्स पॅटिन्सनच्या गोलंदाजीवर माघारी परतला. त्याने ३० धावांची खेळी केली.

एकीकडे कर्णधार वॉर्नर फटकेबाजी करत असतानाही केन विल्यमसन आणि प्रियम गर्ग माघारी परतले. यानंतर कर्णधार डेव्हिड वॉर्नरही झेल देत माघारी परतला. त्याने ४४ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकारांसह ६० धावा केल्या.

मुंबई इंडियन्सकडून ट्रेंट बोल्ट, जेम्स पॅटिन्सन आणि जसप्रीत बुमराहने यांनी प्रत्येकी २-२ तर कृणाल पांड्याने एक बळी घेतला.

- Advertisment -

ताज्या बातम्या