IPL 2023 : आज MI आणि RCB आमनेसामने; कुणाला मिळणार बाद फेरीचे तिकीट?

IPL 2023 : आज MI आणि RCB आमनेसामने; कुणाला मिळणार बाद फेरीचे तिकीट?

मुंबई | Mumbai

आयपीएल २०२३ (IPL 2023) मध्ये आज मंगळवार (दि.९) रोजी मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (MI vs RCB) यांच्यात बाद फेरीच्या शर्यतीत आपले आव्हान कायम ठेवण्यासाठी लढत होणार आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे मैदानावर (Wankhede Ground) सायंकाळी ७:३० वाजता होणार आहे...

याआधी बंगळूरच्या एम चिन्नस्वामी मैदानावर झालेल्या पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळूरने मुंबई इंडियन्सविरुद्ध विजय मिळवला होता. त्यानंतर आता मुंबईवर (Mumbai) दुसऱ्यांदा मात करण्यासाठी बंगळूर सज्ज असणार आहे. तर यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबई आणि बंगळूरच्या खात्यात १० सामन्यात ५ विजय आणि ५ पराभवांसह १० गुण असून बाद फेरीत आपले स्थान पक्के करण्यासाठी दोन्ही संघाना अखेरची संधी असणार आहे.

IPL 2023 : आज MI आणि RCB आमनेसामने; कुणाला मिळणार बाद फेरीचे तिकीट?
Maharashtra Temperature : राज्यात उन्हाचा तडाखा वाढणार

तर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माची (Rohit Sharma) यंदाच्या हंगामातील कामगिरी निराशाजनक राहिली आहे. तर तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, नेहाल वढेरा, कॅमेरून ग्रीन या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे आजच्या निर्णायक सामन्यात कर्णधार रोहित शर्माकडून मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. तसेच गोलंदाजीत सुद्धा मुंबई इंडियन्सने सातत्यपूर्ण कामगिरी केल्याचे दिसून आले आहे.

IPL 2023 : आज MI आणि RCB आमनेसामने; कुणाला मिळणार बाद फेरीचे तिकीट?
शरद पवार म्हणाले, संजय राऊतांच्या लिखाणाला महत्त्व देत नाही

दरम्यान आतापर्यंत मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूर यांच्यात ३० सामने झाले असून बंगळूर संघाने १३ तर मुंबईने १७ सामने जिंकले आहेत. त्यामुळे आजच्या सामन्यात (Match) नेमका कोणता संघ विजयी ठरतो? हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com