
मुंबई | Mumbai
राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार अनिल देशमुखांना (Anil Deshmukh) मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) १२ डिसेंबर रोजी १ लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर सशर्त जामीन (Bail) मंजूर केला होता. मात्र, या जामीनाला सीबीआयने आव्हान देत उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती. त्यावर आज न्यायालयाने निर्णय दिला आहे...
अनिल देशमुख यांच्या जामीनाला स्थगिती द्यावी अशी मागणी सीबीआयने (CBI) याचिकेद्वारे केली होती. त्यानंतर या याचिकेवर आज उच्च न्यायालयात सुनावणी झाली असता न्यायालयाने ही याचिका (Petition) फेटाळून लावत अनिल देशमुख यांचा जामीन कायम ठेवला आहे. त्यामुळे आता देशमुख यांचा तुरुंगातून सुटण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
दरम्यान, अनिल देशमुख यांना ईडीने (ED) १ नोव्हेंबर २०२१ रोजी १०० कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणी अटक (Arrested) केली होती.त्यानंतर देशमुख यांच्यावर सीबीआयने आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल केला होता.