२२ एप्रिलपासून लालपरी जोमाने धावणार?, न्यायालयाने संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना दिला ‘हा’ आदेश

jalgaon-digital
1 Min Read

मुंबई | Mumbai

मागील अनेक दिवसांपासून राज्यातील एसटी कामगारांचा संप (ST Workers Strike) सुरू आहे. एसटी महामंडळाचे (MSRTC) राज्य शासनात विलीनीकरण करण्याच्या मुद्द्यावरून एसटी कामगार (ST Workers) चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

काही कर्मचारी कामावर दाखल देखील झाले आहेत. तर उर्वरित कामगार अद्याप कामावर रूजु झाले नाहीत. एसटी कर्मचाऱ्यांच्या (MSRTC Strike) सुरू असलेल्या संपावर मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) आज महत्त्वाचा निर्णय दिला आहे. २२ एप्रिलपर्यंत संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी रुजू व्हावे, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.

Prarthana Behere : पांढऱ्या नक्षीदार साडीतला ‘प्रार्थना’चा मोहक लूक, पहा फोटो

तसेच सगळ्या कर्मचाऱ्यांना पुन्हा अशी कृती करणार नाही असा इशारा देऊन सेवेत सामावून घ्यावे असे आदेशही एसटी महामंडळाला (ST Mahamandal) न्यायालयाने दिले आहेत. या कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन, ग्रॅच्युएटीचा लाभ देण्याबाबत आदेश देण्याचंही न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. न्यायालयाने संपकरी कर्मचाऱ्यांच्या शक्य त्या सर्व मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे, राज्यात २२ एप्रिलपासून एसटी पुन्हा जोमाने धावण्याची शक्यता आहे.

देशातील सर्वात लहान ‘तोफ’! औरंगाबादच्या विठ्ठल गोरेंची कमाल, पाहा PHOTO

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *