भोसरी जमीन गैरव्यवहारप्रकरणी मंदाताई खडसेंना दिलासा

भोसरी जमीन गैरव्यवहारप्रकरणी मंदाताई खडसेंना दिलासा

मुंबई :

पुण्यातील भोसरी जमीन गैरव्यवहारप्रकरणी ( Land Scam) राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या (Eknath Khadase) पत्नी मंदाताई खडसे (Mandakini Khadse)यांना मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) दिलासा दिला आहे. मंदाताई खडसे यांना १२ जानेवारीपर्यंत अटक करता येणार नाही, असा निर्णय दिला आहे. तसेच याप्रकरणी १२ जानेवारीला पुढील सुनावणी घेण्यात येणार आहे.

भोसरी जमीन गैरव्यवहारप्रकरणी मंदाताई खडसेंना दिलासा
कॅटरिनाने शेअर केला मेहंदीचा फोटो, चाहते शोधताय विकीचे नाव

मुंबई उच्च न्यायालयात मंदाताई खडसे यांनी १४ ऑक्टोबरला धाव घेतली होती. याप्रकरणी न्यायालयाने त्यांना अटकेपासून दिलासा दिला होता. याप्रकरणी आज पुन्हा सुनावणी घेण्यात आली. यावेळी न्यायालयाने १२ जानेवारीपर्यंत मंदिकिनी खडसेंना अटकेपासून दिलासा कायम ठेवला आहे. पुढील सुनावणी १२ जानेवारीला घेण्यात येणार आहे.

भोसरी जमीन गैरव्यवहारप्रकरणी मंदाताई खडसेंना दिलासा
रणबीरच्या प्रश्नावर आलिया का लाजली?

भोसरी भूखंड प्रकरण आहे तरी काय?

2016 मध्ये एकनाथ खडसे हे राज्याचे महसूल मंत्री होते. त्यावेळी त्यांच्यावर पुण्यातील भोसरी येथे भूखंड खरेदीत गैरव्यवहार केल्याचा आरोप केला गेला. एकनाथ खडसे यांनी भोसरी येथील सर्व्हे क्रमांक 52/2 अ/ 2 मधील तीन एकरचा भूखंड त्यांची पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांच्या नावे हा खरेदी केला.

या भूखंडाचा व्यवहार 3 कोटी 75 लाख रूपयांना अकानी नावाच्या व्यक्तीकडून खरेदी केला. पण या भूखंडाचा सातबारा MIDC च्या नावावर होता. त्यामुळे खडसे यांनी पदाचा गैरवापर करून भूखंड खरेदी केल्याचा आरोप झाला.

पुण्यातील बांधकाम व्यावसायिक हेमंत गावडे यांनी यासंदर्भात तक्रार केली होती. एप्रिल 2017 मध्ये ACB ने म्हणजेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एकनाथ खडसे, मंदाकिनी खडसे, गिरीश चौधरी आणि अकानी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. चौकशीही सुरू केली. मात्र 2018 मध्ये त्यांना क्लिन चिट देण्यात आली.

दरम्यान निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्यासाठी झोटिंग समितीही नेमण्यात आली. या समितीमार्फत प्रकरणाची चौकशी झाली. त्यानंतर आता ईडीकडून चौकशी सुरू आहे. याआधीही एकनाथ खडसे यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com