दसरा मेळावा : शिंदे गटाला हायकोर्टाचा मोठा धक्का, 'ती' याचिका फेटाळली

दसरा मेळावा : शिंदे गटाला हायकोर्टाचा मोठा धक्का, 'ती' याचिका फेटाळली

मुंबई | Mumbai

शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याला परवानगी देण्याबाबतची शिंदे गटाची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. यामुळे शिंदे गटाला धक्का बसला आहे. त्यामुळे शिंदे गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होणार नाही हे स्पष्ट झालं आहे.

शिंदे गटातर्फे शिवाजी पार्कसाठी हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. आपला शिंदे गट हीच आपली शिवसेना आहे. त्यामुळे याचिकाकर्त्यांकडे अशा प्रकारची परवानगी मागण्याचा कोणता अधिकार नाही.

दरवर्षी शिवसेनेकडून सदा सरवणकर दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कची परवानगी मागत असतात. त्यामुळे त्यांचा अर्ज हा याचिकाकर्त्यांच्या आधी महानगरपालिकेकडे गेला आहे.

शिवसेनेकडून अनिल देसाई यांनी अर्ज दाखल केला आहे. मात्र, देसाई यांच्याकडे शिवसेनेचे कोणतेही पद नाही. त्यामुळे त्यांच्याकडे शिवसेनेसाठी परवानगी मागण्याचा कोणताही अधिकार नाही. त्यामुळे आपला शिंदे गट आहे हीच खरी शिवसेना. त्यामुळे दसरा मेळाव्यासाठी परवानगी शिंदे गटाला दिली पाहिजे असे शिंदे गटाच्या याचिकेत म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com