मुंबईत मुसळधार; मोडला ४६ वर्षांचा विक्रम

मुंबई पाऊस : पंतप्रधान मोदींचा मुख्यमंत्री ठाकरेंना फोन

मुंबई, ठाणे

मुंबई परिसरात सलग तीन दिवसांपासून संततधार पाऊस सुरु आहे. मुंबई, ठाण्यात पावसाने दाणादाण उडवली. सखल भाग, रस्ते, रेल्वेमार्ग जलमय झाले आणि वाहतुकीचे सर्वच मार्ग पाण्याने रोखले. मुंबईत तब्बल १४१ ठिकाणी झाडे कोसळली. कुलाबा परिसरात ऑगस्ट महिन्यात तब्बल ४६ वर्षांनंतर १२ तासांमध्ये २९४ मिमी पावसाची नोंद झाली. कुलाबा परिसरात १९७४ च्या ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक २६२ मिमी पावसाची नोंद झाली होती.

बुधवारी पावसाने मुंबईला झोडपल्यानंतर आजही अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे. अनेक ठिकाणी पाणी साचले असल्याने मुंबई जलमय झाली आहे. रस्ते तसेच रेल्वे वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला आहे. बुधवारी मुंबईत अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याच्या घटना समोर आले आहेत. दरम्यान पेड रोड येथे भूस्खलन झाले आहे. बुधवारी रात्री पेडर रोड येथे जमीन खचली असून परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. सोसाटय़ाच्या वाऱ्यामुळे अनेक इमारतींच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या, तर पाणीगळती रोखण्यासाठी झोपडय़ांवर घातलेले प्लास्टिक उडून गेल्याचे पाहायला मिळाले.

मुंबईत इतका पाऊस कधी पाहिला नाही

गेल्या चार तासात ३०० मिमी पाऊस झाला असल्याची माहिती महापालिका आयुक्त इकबाल चहल यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे. मुंबईत इतका पाऊस कधीच पाहिला नव्हता असे इकबाल चहल यांनी म्हटले आहे.

विहार तलाव भरला

मुंबईला पाणीपुरवठा करणारे विहार तलाव हे पूर्णपणे भरुन वाहू लागला आहे. मुंबईत 3 दिवस सुरू असलेल्या पावसामुळे बुधवारी रात्री हा तलाव ओसंडून वाहत होता. यापूर्वी काही दिवस आधी म्हणजे 27 जुलै रोजी तुळशी तलावदेखील ओसंडून वाहत होता


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *