Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याIPL Final- 2020 : मुंबई पाचव्यांदा विजेता

IPL Final- 2020 : मुंबई पाचव्यांदा विजेता

दुबई | वृत्तसंस्था

मुंबई इंडियन्स विरुध्द दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झालेल्या आयपीएल २०२० च्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्स ने बाजी मारली.

- Advertisement -

मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सवर पाच विकेट्सनी विजय मिळवत आयपीएलवर पाचव्यांदा आपले नाव कोरले. मुंबईने दिल्लीचे १५७ धावांचे आव्हान १८.४ षटकात ५ गड्यांच्या मोबदल्यात पार केले.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सला ट्रेंट बोल्टने सुरुवातीलाच दोन धक्के दिले. प्रथम फलंदाजी करताना दिल्लीची सुरूवात खराब झाली. स्टॉयनीस (०), अजिंक्य रहाणे (२) आणि शिखर धवन (१५) स्वस्तात बाद झाले. त्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत या दोघांनी संघाचा डाव सावरला.

या दोघांनी दिल्लीला ९ षटकात ५९ धावांपर्यंत पोहतचवले. दोघांनीही सेट झाल्यानंतर धावांची गती वाढवण्यास सुरुवात केली. या दोघांनी चौदाव्या षटकात संघाचे शतक धावफलकावर लावले. दरम्यान पाचव्या क्रमांकावर आलेल्या पंतने आक्रमक फलंदाजी करत पहिल्यादा अर्धशतक पूर्ण केले. पण, अर्धशतकानंतर पंत लगेचच बाद झाला. दिल्ली ने मुंबईला १५७ धावांचे आव्हान दिले

दिल्लीने ठेवलेल्या १५७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईने दमदार सुरुवात केली. कर्णधार रोहित शर्मा आणि क्विंटन डिकॉकने धडाकेबाज फलंदाजी करत या दोघांनी ४ षटकात ४५ धावांची सलामी दिली. पण, फलंदाजी करताना सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर बाद होणाऱ्या स्टॉइनिसने आपल्या पहिल्याच चेंडूवर २० धावा करणाऱ्या डिकॉकला बाद केले. मात्र त्यानंतर आलेल्या सूर्यकुमार यादवने आल्या आल्या आक्रमक फटके मारत दिल्लीवर दबाव वाढवला.

क्विंटन डी कॉक १२ चेंडूत २० धावा करून माघारी परतला, पण रोहित शर्माने सुर्यकुमार यादवच्या साथीने डाव पुढे नेला. रोहितसोबत चांगली भागीदारी असतानाच सूर्यकुमार यादव धावचीत झाला. रोहित हळूच फटका खेळत एकेरी धाव घेण्यासाठी धावला पण रोहित-सूर्यकुमार यांच्यात धाव घेण्यावरून गोंधळ झाला. अखेर रोहित नॉन-स्ट्राईकला पोहोचल्याचं पाहून सूर्यकुमारने आपली क्रीज सोडली आणि स्वत:ला धावबाद करवून घेतलं.

सूर्यकुमारने २० चेंडूत १९ धावा केल्या. रोहितने मात्र सूर्यकुमारच्या विकेटचं बलिदान व्यर्थ जाऊ दिलं नाही. त्याने ५१ चेंडूत दमदार ६८ धावा कुटल्या. तो बाद झाल्यावर इशान किशन आणि कृणाल पांड्या जोडीने विजयाची औपचारिकता पूर्ण केली. मुंबईचे हे पाचवे विजेतेपद ठरले, तर रोहितसाठी एखाद्या संघाचे प्रतिनिधीत्व करताना हे सहावे आयपीएल विजेतेपद ठरले.

- Advertisment -

ताज्या बातम्या