Kishori Pednekar : मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण?

Kishori Pednekar : मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण?

मुंबई । Mumbai

मुंबईतील कथित कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी (Covid Center Scam) माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील आग्रीपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद झाली आहे. किशोरी पेडणेकर यांच्यासह महापालिकेच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही गुन्हा दाखल झाला आहे. बॉडी बॅग (Body Bag) खरेदीत घोटाळा केल्याचा आरोप किशोरी पेडणेकर यांच्यावर आहे.

मुंबई महापालिकेने कोरोना काळात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. कोविड काळात काढण्यात आलेल्या टेंडर प्रक्रियेत मोठा घोटाळा झाल्याचं अंमलबजावणी संचलनालय (ED) म्हणणं आहे. यात किशोरी पेडणेकर यांचाही सहभाग होता, असं ईडीचं म्हणणं आहे. त्यामुळे किशोरी पेडणेकर यांचीही चौकशी होणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यातच आता किशोरी पेडणेकर यांच्यासह दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

किशोरी पेडणेकर आता जेलमध्ये जाणार - किरीट सोमय्या

किशोरी पेडणेकर आता जेलमध्ये जाणार आहेत. दीड हजार रुपयांची डेड बॉडी बॅग 6 हजार 700 रुपयांना खरेदी केली. मुंबई पोलिसांनी किशोरी पेडणेकर आणि एएमसीविरोधात एफआयआर दाखल केला. याआधी ईडीनेही छापे टाकले होते. आम्ही सुद्धा 13 जुलै रोजी तक्रार दाखल केली होती. आणखी तीन घोटाळ्यांचा तपास सुरू आहे. यावरही लवकरच कारवाई होईल. आधी संजय राऊत यांचे साथीदार सुजीत पाटकर जेलमध्ये गेले होते, आता किशोरी पेडणेकर नंतर आणखी तीन नेते जेलमध्ये जातील अशी प्रतिक्रिया भाजप नेते किरीट सोमय्या यांनी प्रसारमाध्यमांना दिली.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com