राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. रेणू शर्माकडून कौटुंबिक कारण देत तक्रार मागे घेत असल्याचे पत्र पोलिसांना दिले आहे.

तक्रार मागे घेतल्याने फाईल बंद होणार आहे.धनंजय मुंडे यांच्याविरोधात रेणू शर्मा या तरुणीने इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवल्याची तक्रार मुंबईतल्या ओशिवरा पोलीस ठाण्यात दाखल केली होती.

तिने बॉलीवूडमध्ये चांगली संधी मिळवून देण्याच्या नावाखाली आपल्यावर 2006 पासून अत्याचार सुरु होते असेही तिने तक्रारीत म्हटले होते. धनंजय मुंडे यांनी तेव्हाच सर्व आरोप फेटाळले होते. हे आरोप खोटे असून बदनामी करणारे आणि आपल्याला ब्लॅकमेल करण्यासाठी असल्याचा दावा मुंडे यांनी केला होता.

घरगुती करण आणि राजकारण होत असल्याने रेणू शर्माने तक्रार मागे घेत असल्याचे म्हटले आहे.

रेणू शर्माने तक्रार मागे घेतल्यामुळे तिच्याविरोधात 192 अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी महिला नेत्यांकडून केली जात आहे