एमपीएससी : उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचा प्रश्न आज निकाली लागण्याची शक्यता

अजित पवारंनी बोलवली बैठक, अनेक मंत्री, अधिकारी उपस्थित राहणार
एमपीएससी : उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचा प्रश्न आज निकाली लागण्याची शक्यता
उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई | प्रतिनिधी

एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या नियुक्तीसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज महत्वाची बैठक बैठक बोलावली आहे. आज साडेदहाच्या सुमारास ही बैठक होत आहे....

स्वप्निल लोणकरच्या आत्महत्येनंतर चर्चेत आलेल्या एमपीएससी उत्तीर्ण उमेदवारांच्या नियुक्तीबाबत आज उपमुख्यमंत्री अजित पवार महत्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.

थोड्याच वेळात या बैठकीला सुरुवात होणार आहे. या बैठकीला सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, राज्याचे मुख्य सचिव, सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव आणि एमपीएससी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ उपस्थित राहणार आहे.

यामुळे या बैठकीत एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या नियुक्तीबाबत काय निर्णय होतो, याकडे एमपीएससी विद्यार्थ्यांसह राजकीय वर्तुळाचंही लक्ष लागून राहिले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com