Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्यामुंबईने चेन्नईला नमवले

मुंबईने चेन्नईला नमवले

शारजा । वृत्तसंस्था

मुंबई इंडियन्स विरुध्द चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात झालेल्या सामन्यात मुंबई संघाचा विजय झाला.

- Advertisement -

नाणेफेक जिंकून मुंबईच्या संघाने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी आलेल्या चेन्नईची सुरूवात खूपच खराब झाली. ऋतुराज गायकवाड (०), अंबाती रायडू (२), जगदीशन (०), फाफ डु प्लेसिस (१) आणि अष्टपैलू रविंद्र जाडेजा (७) हे फलंदाज पॉवरप्लेमध्येच बाद झाले.

कर्णधार धोनीही स्वस्तात (१६) बाद झाला. पण नवख्या सॅम करनने एकाकी झुंज देत संघाला शंभरी पार करून दिली. त्याने ४७ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ५२ धावा केल्या. ट्रेंट बोल्टने ४ गडी टिपले. चेन्नईच्या फलंदाजांनी फक्त ११४ धावा केल्या

इशान किशनने केलेल्या धमाकेदार अर्धशतकाच्या बळावर मुंबईने दणदणीत विजय साजरा केला. ११४ धावा धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीला आलेल्या इशान किशन-क्विंटन डी कॉक जोडीने नाबाद शतकी भागीदारी करत लक्ष्य पूर्ण केलं. किशनने नाबाद ६८ तर डी कॉकने नाबाद ४६ धावा केल्या आणि मुंबईला १० गडी राखून विजय मिळवून दिला.

चेन्नई सुपर किंग्ज आजपर्यंत दोन वेळा १० गडी राखून विजय मिळवला होता, पण चेन्नईच्या गोलंदाजांना डावात एकही गडी बाद करता आला नाही अशी गोष्ट प्रथमच घडली. १० गड्यांनी पराभव होण्याची ही चेन्नईच्या संघाची संपूर्ण आयपीएल कारकिर्दीतील पहिली वेळ ठरली. मुंबईच्या सलामी जोडीनेच चेन्नईच्या अपेक्षांचा चक्काचूर केला. मुंबईविरूद्धच्या पराभवामुळे चेन्नईला दणका बसला.

.

- Advertisment -

ताज्या बातम्या