मुंबईसह राज्यात हवा प्रदुषणात वाढ !

 मुंबईसह राज्यात हवा प्रदुषणात वाढ !

मुंबई | Mumbai

अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने हवेतील धुलिकण कमी होऊन प्रदूषणात (Pollution) घट झाली होती. त्यानंतर दिवाळीत फटाक्यांच्या आतषबाजीमुळे वायू प्रदूषणात (Air Pollution) पुन्हा वाढ झाली आहे. मुंबईसह राज्यात हवेची गुणवत्ता बिघडली आहे. दिवाळी आधी हवेची पातळी घसरली होती. त्यातच आता दिवाळीत फटाक्यांच्या आतषबाजीमुळे हवेची गुणवत्ता खराब झाली आहे. दिवाळीच्या (Dipawali) काही दिवस आधी मुंबईसह (Mumbai) राज्यात वायू प्रदूषणात वाढ झाली होती.

देशात मुंबई दिल्लीसह (Delhi) अनेक शहरांची हवा प्रदूषित झाली होती. त्यानंतर अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने हवेतील धुलिकण कमी होऊन प्रदूषणात घट झाली होती. त्यानंतर दिवाळीत मात्र वायू प्रदूषण पुन्हा वाढले आहे. दिवाळीत फटाक्यांवर निर्बंध असतानाही अनेक ठिकाणी नियम धाब्यावर बसवले. मुंबईमध्ये नागरिकांनी फटाके (Firecrackers) फोडण्याच्या पालिकेच्या नियमांचं पालन केले नाही.

अनेक ठिकाणी रात्री 8 ते 10 या वेळे व्यतिरिक्त दुपारपासून मध्यरात्रीपर्यंत फटाके फोडल्याचे चित्र पाहायला मिळाले. पुण्यातील हवेची गुणवत्ताही घसरली आहे. मुंबई, पुण्यासह (Pune) राज्यभरात अनेक शहरात हवेची गुणवत्ता ढासळली आहे. दिवाळीत फटाके (Firecrackers) फोडण्याच्या वाढत्या प्रमाणामुळे वायू प्रदूषणासोबत ध्वनी प्रदूषणातही (Noise Pollution) वाढ झाली आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com