Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यामुलायम सिंह यादव यांचे निधन

मुलायम सिंह यादव यांचे निधन

नवी दिल्ली | New Delhi

समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव (Mulayam Singh Yadav) यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी निधन (Passed away) झाले आहे.

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात ( Medanta Hospital) उपचार सुरु होते. तसेच १ ऑक्टोबर रोजी त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते.

मुलायम सिंह यादव यांचा जन्म २९ नोव्हेंबर १९३९ साली उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) इटावा येथे झाला. त्यांनी अगदी तरुण वयापासून राजकारणात सक्रीय सहभाग घेतला होता. मुलायम सिंह यांनी तीन वेळा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीपद भूषवले.तसेच १९९६ ते १९९८ दरम्यान ते केंद्र सरकारमध्ये संरक्षणमंत्रीही (Minister of Defence) होते. तर ५ डिसेंबर १९८९ रोजी मुलायम यांनी पहिल्यांदा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. ते २४ जानेवारी १९९१ पर्यंत या पदावर कार्यरत होते.

त्यानंतर मायावती उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री झाल्या. १९९२ साली समाजवादी पक्षाची स्थापना केल्यानंतर वर्षभरात म्हणजेच ५ डिसेंबर १९९३ रोजी मुलायम सिंह दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले. तसेच २९ ऑगस्ट २००३ रोजी त्यांनी तिसऱ्यांदा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यावेळी त्यांनी पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करण्याआधीच म्हणजेच चार वर्ष झाल्यानंतर ११ मे २००७ रोजी पदाचा राजीनामा दिला.

दरम्यान, १९९२ साली मुलायम सिंह यांनी समाजवादी पक्षाची स्थापना केली. तसेच त्यांच्या निधनामुळे समाजवादी पक्षावर (Samajwadi Party) शोककळा पसरली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या