मुळानेबारी अपघात : मृतांची संख्या सहा वर; १५ जखमी, सर्वजण 'या' जिल्ह्यातील

मुळानेबारी अपघात : मृतांची संख्या सहा वर; १५ जखमी, सर्वजण 'या' जिल्ह्यातील

नाशिक | प्रतिनिधी

नाशिक जिल्ह्यातील कळवण आणि दिंडोरी तालुक्याला जोडणाऱ्या मुळाने बारीत आज सायंकाळी भीषण अपघात घडला. या अपघातातील मृतांची संख्या वाढून सहावर पोहोचली आहे. तर १५ जण गंभीर जखमी झाले असून त्यांना नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे....

अधिक माहिती अशी की, मार्कंडऋषी पर्वताच्या (Markand Mountains) पायथ्याशी असलेल्या मुळाणे बारी येथे ही दुर्घटना घडली.

रस्त्याच्या कामासाठी ट्रॅक्टरला दोन ट्रॉली जोडत एका ट्रॉलीमध्ये मजुर होते. यावेळी ट्रॅक्टरवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टरसह दोन्ही ट्रॉली उलटल्या. समोरून येणाऱ्या एका अल्टो कारवर (Alto car) या ट्रॉली कोसळल्याने या दुर्घटनेत चार वर्षांच्या दोन मुलींसह चार मजुरांचा मृत्यू झाला आहे.

अपघातातील मयत आणि जखमी सर्व जळगाव जिल्ह्यातील धरणगाव, पारोळा आणि भडगाव तालुक्यातील आहेत.

याप्रकरणी वणी (ता. दिंडोरी) पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास नाशिक ग्रामीण पोलीस करत आहेत.

अपघातातील मयत व जखमींची नावे अशी

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com