जळगावनंतर मुक्ताईनगरात भाजपला धक्का : ६ नगरसेवक शिवसेनेत

जळगावनंतर मुक्ताईनगरात भाजपला धक्का : ६ नगरसेवक शिवसेनेत
breaking news

मुंबई:

मुक्ताईनगर पालिकेतील भारतीय जनता पक्षाचे ६ नगरसेवक भाजपाला रामराम करत शिवसेनेत दाखल झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत या ६ नगरसेवकांनी हाती शिवबंधन बांधला. कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडलाय. या नगरसेवकांमध्ये मुक्ताईनगरमधील पियुष महाजन, संतोष कोळी, मुकेश वानखेडे यांचा समावेश आहे.

जळगावनंतर मुक्ताईनगरात भाजपला धक्का : ६ नगरसेवक शिवसेनेत
मालेगाव बाँबस्फोटाचे तपासाधिकारी सीबीआयचे संचालक

मुक्ताईनगरातील ६ नगरसेवक आज शिवसेनेत दाखल झाले. त्यानंतर चार नगरसेवक येत्या दोन-चार दिवसांत शिवसेनेत दाखल होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मुक्ताईनगर नगरपंचायतीमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळालेले आहे. येथील नगराध्यक्षा नजमा तडवी यांच्यासह सत्ताधारी गटातील नगरसेवक हे खडसे गटाचे समर्थक आहेत. मात्र सत्ताधारी गटात कुरबुरी सुरू झाल्या. दोन दिवसांपूर्वी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या निधीतून मंजूर करण्यात आलेल्या कामांना बहुमताने मंजुरी देण्यात आल्याने अनेकांना आश्चर्य वाटले होते.

काही दिवसांपूर्वी जळगाव महानगरपालिकेतील शिवसेनेने भाजपचे तब्बल २७ नगरसेवक आपल्या गळाला लावले. भाजपला हा एक मोठा झटका बसला होता. हे नगरसेवक शिवसेनेच्या तंबूत गेल्याने फुटीर नगरसेवकांना व्हीप न बाजवता आल्याने भाजपने कोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र, औरंगाबाद खंडपीठाने भाजपची ही याचिका फेटाळून लावली होती.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com