‘सिल्व्हर लेक’ जिओनंतर आता रिलायन्स रिटेलमध्ये करणार एवढी गुंतवणूक

मुंबई | प्रतिनिधी

जगातील सर्वात मोठी गुंतवणूक करणारी कंपनी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या सिल्वर लेक (Silver Lake) कंपनीने जिओमध्ये गुंतवणूक केल्यानंतर आता रिलायन्स इंडस्ट्रीजची उपकंपनी असलेल्या रिलायन्स रिटेलमध्ये…

1.75% इक्विटीसाठी 7 हजार 500 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा केली आहे. या करारात रिलायन्स रिटेलचे प्री-मनी इक्विटी मूल्य अंदाजे 4.21 लाख कोटी रुपये आहे.

याबाबतची माहिती रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि रिलायन्स रिटेल व्हेन्चर्स लिमिटेड (RRVL) यांनी आज दिली.

सिल्व्हर लेक हे जगातील तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वात मोठे गुंतवणूकदार आहेत. रिलायन्स सिल्व्हर लेकने यापूर्वी जिओ प्लॅटफॉर्मवर 1.35 अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे 10200 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. रिलायन्स रिटेल आणि जिओ प्लॅटफॉर्मचे एकूण मूल्यांकन 9 लाख कोटींच्या पुढे गेले आहे.

देशातील अनेक शहरांमध्ये पसरलेल्या 12 हजाराहून अधिक स्टोअरमध्ये वर्षाकाठी रिलायन्स रिटेलचा दर वर्षाला 64 कोटीं फूटफॉल आहे. रिलायन्सचे मालक मुकेश अंबानी यांनी 3 कोटी किराणा दुकान आणि 120 दशलक्ष शेतकर्‍यांना या नेटवर्कद्वारे जोडण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

किराणा क्षेत्रातील जियोमार्ट या ऑनलाइन स्टोअर कंपनीने नुकतीच ऑनलाईन बाजारात पदार्पण केले आहे. जिओमार्टवर दररोज सुमारे 4 लाख ऑर्डर बुक होत आहेत.

कोट्यावधी छोटे व्यापारी आपल्या गुंतवणूकीतून भागीदारी करण्याच्या आमच्या परिवर्तनीय कल्पनेत सिल्व्हर लेकशी जोडले गेले आहेत. याचा आम्हाला आनंद होत आहे. भारतीय रिटेल क्षेत्रातील भारतीय ग्राहकांना मूल्य आधारित सेवा देण्याचा आमचा प्रयत्न आहे.

रिटेल क्षेत्रात आवश्यक बदल घडवून आणण्यात तंत्रज्ञान महत्त्वपूर्ण ठरेल आणि रिटेल इको सिस्टमशी संबंधित सर्व घटक अधिक चांगले विकास प्लॅटफॉर्म तयार करण्यास सक्षम असतील. भारतीय रिटेल क्षेत्रातील आमची दूर दृष्टी वाढविण्यासाठी सिल्व्हर लेक महत्त्वपूर्ण भागीदार ठरेल, असे मुकेश अंबानी म्हणाले.

मुकेश अंबानी आणि रिलायन्सच्या टीमने त्यांच्या प्रयत्नांद्वारे रिटेल व तंत्रज्ञान क्षेत्रात नेतृत्व मिळवले आहे. इतक्या कमी वेळात जिओमार्टने मिळविलेले यश, खासकरुन जेव्हा कोविड -19 साथीच्या काळात भारत इतर जगाशी लढत होता ते खरोखरच अभूतपूर्व असल्याचे सिल्व्हर लेकचे सह-मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय भागीदार एजॉन डर्बन म्हणाले.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *