कोरोना रुग्णांसाठी रिलायन्सने उचलले हे मोठे पाऊल

कोरोना रुग्णांसाठी रिलायन्सने उचलले हे मोठे पाऊल

मुंबई :

देशभरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. गेल्या दोन दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या दोन लाखापेक्षा जास्त गेली आहे. वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. महाराष्ट्र सरकारने हवाई दलाचा वापर ऑक्सिजन पुरवठ्यासाठी करण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली. या पार्श्वभूमीवर रिलायन्स समूहाने मोठे पाऊल उचलले आहे.

रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी कोरोनाबाधितांच्या मदतीसाठी मोठे पाऊल उचलले आहे. मुकेश अंबानी यांनी त्यांच्या तेल कारखान्यात ऑक्सिजन निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजमधील रिफायनरीजमधून रुग्णालयांना विनाशुल्क ऑक्सिजन दिले जाणार आहे. अंबानींच्या गुजरातमधील जामनगरमध्ये दोन रिफायनरी आहे. यात थोडसे बदल केल्यानंतर या ठिकाणी वापरला जाणारा औद्योगिक ऑक्सिजन हा मेडिकलसाठी उपयुक्त ऑक्सिजन म्हणून वापरला जाऊ शकतो. हा ऑक्सिजन सिलेंडरच्या माध्यमातून महाराष्ट्रासह इतर राज्यात पुरवठा केला जाऊ शकतो.

१०० टन ऑक्सिजन मिळणार

पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, रिलायन्सच्या जामनगर कारखान्यातील ऑक्सिजन सिलेंडर ट्रकमध्ये भरुन पुरवठ्यासाठी तयार आहे. या रिफायनगरीतील १०० टन ऑक्सिजन विनामूल्य राज्यात वितरित केले जाईल, अशा विश्वास आहे. महाराष्ट्राचे नगरविकास त्यामुळे रिलायन्स रिफायनरीमधून राज्याला 100 टन ऑक्सिजन मिळणार आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com