नाशिकमध्ये म्युकरमायकोसिस सर्जरीसाठी ऑपरेशन थिएटर होणार

नाशिकमध्ये म्युकरमायकोसिस सर्जरीसाठी ऑपरेशन थिएटर होणार
Mucormycosis

नाशिकरोड

राज्यात म्युकरमायकोसिस आजाराचे प्रमाण वाढत असल्याने आरोग्य विभागासह नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या परिस्थितीशी सामना करण्यासाठी बिटको कोविड सेंटर मध्ये म्युकरमायकोसिस सर्जरीसाठी लवकरच ऑपरेशन थिएटर सुरू करण्यात येणार आहे. पुढील महिन्याभरात हे ऑपरेशन थिएटर सुरू होण्याची शक्यता आहे.

सध्या म्युकरमायकोसिस आजार वाढत चालला आहे. यासाठी पालिकेच्या आरोग्य विभागाकडून नाशिकरोडच्या बिटको हॉस्पिटलमध्ये तयारी सुरू करण्यात येत आहे. दोन दिवसांपूर्वीच महानगरपालिकेचे वैद्यकीय पथकाबरोबरच बांधकाम व विद्युत पथकाने भेट देऊन येथील पाहणी केली. ऑपरेशन थिएटर तयार करायला किमान एक महिना लागेल असा अंदाज येथील कोविड सेंटर प्रमुख डॉ. जितेंद्र धनेश्वर यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान या आजारावर स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यासाठी बिटको कोवीड सेंटर येथे हालचाली सुरू झाल्या आहेत. म्युकरमायकोसिस आजार वाढल्यास अशा रुग्णांची सोय व उपचार करण्यासाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्याचे काम सुरू आहे.

म्युकरमायकोसिस या आजाराचे रुग्ण बिटको हॉस्पिटल येथे यायला सुरुवात झाली आहे, या आजारावर उपचार करण्यासाठी अद्ययावत सर्जरी कक्ष येथे उपलब्ध नाही म्हणून याच कोविड सेंटरच्या बिल्डिंगमध्ये एक ऑपरेशन थेटर तयार करण्याचे सुरू होणार आहे. या पाहणीमध्ये ऑपरेशन थिएटर खोल्यांची पाहणी करण्यात आली. सर्जरीसाठी आवश्यक असणाऱ्या सुविधा आणि साधनांची योग्य पद्धतीने याठिकाणी सोय कशी होईल यासंबंधी विचार केला जातो आहे. या ऑपरेशन थिएटरमुळे रुग्णांना दिलासा मिळणार आहे, सध्या प्राथमिक स्वरूपात कामकाज सुरू करण्यात आले आहे. किमान तीस दिवस हे ऑपरेशन थिएटर निर्माण होण्यासाठी लागणार असून म्युकरमायकोसिस या आजारावरील सर्जरी याच ठिकाणी करण्यात येणार आहे.

दुसर्‍या लाटेमध्ये नाशिक शहरात कोरोनाने हाहाकार माजवला असताना हजारो रुग्णांसाठी बिटको रूग्णालय उपचारासाठी मोठे आधार बनले आहे, गरीब च नाहीतर आर्थिक परिस्थिती चांगली असणार्‍यांनी देखील येथे उपचार घेऊन कोरोनावर मात केली. अनेकविध समस्यांचा सामना करूनही रूग्णालयात आजही तीनशेहून अधिक रुग्णावर उपचार सुरू आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com