मोठी बातमी! 'म्युकरमायकोसिस'वरील इंजेक्शनचे वर्ध्यात उत्पादन सुरु, आता 'इतक्या' रुपयांना मिळणार इंजेक्शन

मोठी बातमी! 'म्युकरमायकोसिस'वरील इंजेक्शनचे वर्ध्यात उत्पादन सुरु, आता 'इतक्या' रुपयांना मिळणार इंजेक्शन

मुंबई | Mumbai

करोनाच्या दुसऱ्या लाटेनं देशात थैमान घातलं असतानाच आता 'म्युकरमायकोसिस' म्हणजेच ब्लॅक फंगस (Black Fungus) नावाच्या आजारानं डोकं वर काढलं आहे. त्यातच म्युकरमायकोसिस आजारावर प्रभावी असलेल्या औषधांचाही तुटवडाही निर्माण झाल्याने चिंतेत आणखी भर पडली होती.

अशातच ब्लॅक फंगसवरील उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या इंजेक्शनबाबत एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. आतापर्यंत बाजारात ७००० रुपयात मिळणारं हे इंजेक्शन अवघ्या १२०० रुपयात उपलब्ध होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हे इंजेक्शन लॉन्च केलं आहे.

वर्ध्याच्या जेनेटिक लाईफ सायन्सने ब्लॅक फंगसवरील उपयोगी Amphotericin B Emulsion या इंजेक्शनचे उत्पादन सुरु केलं असून सोमवारपासून त्याचं वितरण करणार असल्याचं स्पष्ट केलंय. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नानंतर या कंपनीला या उत्पादनाची परवानगी मिळाली होती.

सध्याच्या घडीला देशातील केवळ एकच कंपनी Amphotericin B Emulsion इंजेक्शनची निर्मिती करत होती. त्यानंतर आता जेनेटेक लाईफ सायन्सेस ही या इंजेक्शनची निर्मिती करणारी दुसरी कंपनी ठरली आहे. यामुळे इंजेक्शनची टंचाई दूर होईल आणि रुग्णांच्या नातेवाईकांची धावाधाव होणार नाही. जेनेटेक लाईफ सायन्सेसनं तयार केलेल्या इंजेक्शनची किंमत १२०० रुपये असणार आहे. सोमवारपासून इंजेक्शनचं वितरण सुरू होईल.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com