एसटी महामंडळाची बस नर्मदा नदीत कोसळली

एसटी महामंडळाची बस नर्मदा नदीत कोसळली

मुंबई | Mumbai

एसटी महामंडळाची बस नर्मदा नदीत कोसळल्याची धक्कादायक घटना मध्यप्रदेशमधील धार जिल्ह्यातील घागरगाव येथे घडली आहे.

या अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला असून १५ जणांना वाचवण्यात यश आले आहे. या बसमध्ये ५० ते ६० प्रवासी होते अशी प्राथमिक माहिती आहे. प्रशासनाकडून सध्या मृतांची ओळख पटवली जात आहे.

इंदोर वरून पुण्याला येताना हा अपघात झाला असून बचाव कार्यासाठी एनडीआरएफ व एनडीआरएफ चे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. दरम्यान मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com