दिवाळी सुट्टीत 'गाव तेथे रस्ता अन रस्ता तेथे एसटी'साठी 'लालपरी' सज्ज

दिवाळी सुट्टीत 'गाव तेथे रस्ता अन रस्ता तेथे एसटी'साठी 'लालपरी' सज्ज
एसटी

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

आगामी दिवाळी सण आणि येणाऱ्या सलग सुट्ट्यांमध्ये पर्यटनाला आणि गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी एसटी (MSRTC) पुन्हा एकदा सज्ज झाली आहे. राज्यातील पर्यटन स्थळांच्या भेटीसाठी जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाने राज्यभरातील आगारातून दररोज सुमारे १ हजार जादा गाड्यांचे नियोजन केले आहे, अशी माहिती परिवहन मंत्री ॲड.अनिल परब (Transport Minister Adv Anil Parab) यांनी दिली....

२९ ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत या जादा बसेस (extra buses) सोडण्यात येणार आहेत. जादा गाडया आरक्षणासाठी (ST available for reservation) उपलब्ध होणार असून प्रवाशांनी या जादा गाड्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही परब यांनी केले.

दिवाळीच्या सुट्टीत प्रवाशी महाराष्ट्रातील अनेक पर्यटन स्थळांना भेट देतात, तर अनेक जण आपापल्या गावी जातात. किफायतशीर दर आणि सुरक्षित प्रवास म्हणून प्रवासी दरवर्षी एसटीला प्राधान्य देतात. गेल्यावर्षी राज्यावर असलेले कोरोनाचे संकट पाहता प्रवाशांनी पर्यटनाकडे पाठ फिरवली होती. यंदा महामंडळाने प्रवाशांच्या सोयीसाठी नियमित गाड्या व्यतिरिक्त राज्यभरातील आगारातून दररोज १००० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे, असे परब यांनी सांगितले.

सुट्ट्यांमुळे प्रवाशांची होणारी वाढती गर्दी पाहता गाड्यांचे योग्य नियोजन करा, सर्व बसेस सुस्थितीत ठेवा. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून सर्व गाड्या स्वच्छ आणि निर्जंतुकीकरण कराव्यात, असे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच प्रवाशांनीही प्रवासादरम्यान मास्क लावणे, सॅनिटाईजचा वापर आदी कोरोनाविषयक नियमांचे पालन करावे, असे परब म्हणाले.

दरम्यान, प्रवाशांनी आपली गैरसोय टाळण्यासाठी एसटी महामंडळाच्या http://public.msrtcors.com आणि MSRTC Mobile Reservation App या अधिकृत संकेतस्थळ तसेच मोबाईल अँपवर आगाऊ आरक्षण करावे, असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.

Related Stories

No stories found.