‘नाथजल’चीच विक्री करा, अन्यथा परवाना रद्द

एसटी महामंडळाचा इशारा
‘नाथजल’चीच विक्री करा, अन्यथा परवाना रद्द

नाशिक | प्रतिनिधी

उत्पन्नासाठी एसटी महामंडळाने सुरू केलेल्या ‘नाथजल‘ बाटलीबंद पाण्याची विक्री केली नाही तर परवाना रद्द करण्याचा इशारा महामंडळाने एसटी आगारातील उपहारगृहचालक, दुकानदारांना दिला आहे. सध्या एक लिटर बाटलीबंद पाण्याची मूळ किंमतीतच व्रिक्री करण्याच्याह सूचना केल्या आहेत...

दिड वर्षांच्या प्रतिक्षेनंतर महामंडळाची बाटलीबंद पाणी व्रिक्रीची योजना नोव्हेंबरमध्ये प्रत्यक्षात आली. नाथजल नावाने या पाण्याची व्रिक्री एसटी आगार, स्थानकातील उपहारगृह, दुकान व अन्य आस्थापनात केली जाते. एक लिटर बाटलीबंद पाणी १५, तर ६५० लिटर १० रुपये असे दर आहेत.

पहिल्या टप्प्यात पुणे, नाशिक, मुंबई, ठाणे, सातारा,अहमदनगर, सोलापूर या विभागात विक्री सुरू झाली. येथे दररोज सहा हजार पाण्याच्या बाटल्यांची व्रिक्री होत असल्याचे समजते. उपहारगृहचालक, दुकानदारांनी फक्त नाथजलचीच विक्री करावी. दुसऱ्या कंपन्यांच्या बाटलीबंद पाण्याची व्रिक्री न करण्याच्या सूचना आहेत.

तसे केल्यास त्याचा परवाना रद्द होईल. अन्य कंपन्याचे बाटलीबंद पाणी एका महिन्यात संपवण्याचेही आदेश आहेत. याशिवाय १५ रुपये बाटलीबंद पाण्याची व्रिक्री चढय़ा दराने केल्यासही परवाना रद्द केला जाईल.

सध्या एक लिटर नाथजल बाटलीबंद पाण्याचीच विक्री होत आहे. ६५० लिटलच्या बाटलीबंद पाण्याच्या विक्रीसाठी स्वतंत्रपणे शासनाची मंजुरी लागणार आहे. त्याची प्रक्रिया सुरु आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com