Wednesday, April 24, 2024
Homeमहाराष्ट्रGood News : एसटी कर्मचाऱ्यांना गुरुवारपर्यंत एक महिन्याचा पगार

Good News : एसटी कर्मचाऱ्यांना गुरुवारपर्यंत एक महिन्याचा पगार

मुंबई

गेल्या काही महिन्यांपासून एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांचे पगार रखडलेला आहे. आता हा प्रश्न निकाली निघण्याची शक्यता आहे. या कर्मचाऱ्यांचा एका महिन्याचा पगार येत्या गुरुवारपर्यंत देण्यात येणार आहे.

- Advertisement -

पगार नसल्यामुळे एसटी कर्मचारी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. करोनामुळे पाच महिन्यांपासून एसटी बस सेवा या बंद होत्या. यामुळे एसटी महामंडळाला प्रचंड आर्थिक नुकसान सहन करावा लागला.पर्यायाने एसटी कर्मचाऱ्यांचे पगार गेल्या काही महिन्यांपासून रखडले होते. या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री अनिल परब यांनी अर्थमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. त्यावेळी एसटी कर्मचाऱ्यांनी थकीत पगाराची रक्कम तात्काळ देण्याची मागणी केली.या भेटीत कर्मचाऱ्यांचे वेतन देण्याचे त्यांनी मान्य केले.कर्मचाऱ्यांचा एका महिन्याचा पगार येत्या गुरुवारपर्यंत (८ ऑक्टोंबर) त्यांच्या खात्यात जमा होईल. या भेटीनंतर अनिल परब यांनी ट्विट करत एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा देणारी बातमी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या