नाशिक-पुणे महामार्गावर बसला आग; चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली

नाशिक-पुणे महामार्गावर बसला आग; चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली

नाशिकरोड | दिगंबर शहाणे | Nashik Road

त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) येथून शिर्डीला (Shirdi) जाणाऱ्या बसमधील बॅटरीच्या वायरचा शॉर्टसर्किट झाल्याने अचानकपणे बसला आग (Fire) लागल्याची घटना घडली असून बस चालकाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला...

नाशिक-पुणे महामार्गावर बसला आग; चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली
... तर तुम्ही मुख्यमंत्री झाल्यावर काय करणार? आमदार रोहित पवारांना विद्यार्थ्यांचा सवाल

याबाबत अधिक माहिती अशी की, त्र्यंबकेश्वरवरून शिर्डीकडे एमएच १४ बी.टी. ४११७ या क्रमांकाची बस जात होती. ही बस नाशिक-पुणे महामार्गावर (Nashik-Pune Highway) असलेल्या उपनगर नाक्याजवळ येताच बसच्या बॅटरीमधील वायर लीक झाल्याने मोठ्या प्रमाणावर धूर निघू लागला. त्यानंतर धूर निघाल्याचे कळताच बस चालकाने (Bus Driver) तातडीने बस थांबविली.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

नाशिक-पुणे महामार्गावर बसला आग; चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली
Video : दोन एकर कांदा पिकावर शेतकऱ्याने फिरवला रोटर

तसेच पाठीमागून शहर वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक दिनकर कदम हे देखील तात्काळ आपल्या वाहनाने घटनास्थळी आले. यानंतर तातडीने त्यांनी आपल्या सहकार्यासमवेत बसमधील प्रवाशांना (Passengers) खाली उतरवून पाण्याच्या बंबला पाचारण केले. त्यानंतर बंब दाखल होताच पाण्याचा (Water) मारा करून सदर बसची आग विझविण्यात आली.

नाशिक-पुणे महामार्गावर बसला आग; चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली
सोनिया गांधी राजकारणातून निवृत्ती घेणार?

दरम्यान, याआधी देखील काही महिन्यांपूर्वी मिरची हॉटेल जवळ दहा जणांचा बस आगीच्या दुर्घटनेत मृत्यू झाला होता. त्यानंतर नाशिक-पुणे महामार्गावर पळसे येथे देखील महामंडळाची बस पेटली होती. त्यात दोन दुचाकी चालकांचा जळून मृत्यू (Death) झाला होता. या दोन्ही घटना ताज्या असतानाच ही मोठी घटना टळली. त्यामुळे नागरिकांमध्ये व प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

नाशिक-पुणे महामार्गावर बसला आग; चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली
आरबीआयने 'या' बँकांवर घातले निर्बंध
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com