सरकारचा थाट पण लागेल गरीबाची वाट; उमेदच्या कर्मचाऱ्यांचे नाशकात आंदोलन

jalgaon-digital
2 Min Read

नाशिक | प्रतिनिधी

उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत कंत्राटी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अचानक पुनर्रनियुक्ती थांबविण्याचे आदेश देण्यात आल्याने संतापलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आज नाशिक शहरातील गोल्फ क्लब मैदान येथे आंदोलन केले. शांततेच्या मार्गाने झालेल्या या आंदोलनाला हजारो महिलांची यावेळी उपस्थिती होती….

उमेद-MSRLM अंतर्गत ग्रामीण भागातील गरीबातील गरीब कुटुंबाना स्वयंसहायता समूहाच्या माध्यमातून संघटीत करण्याचे काम सुरु आहे. स्वयंसहायता समुह, ग्रामसंघ व प्रभागसंघ अशी त्रिस्तरीय संस्थीय बांधणी करून या संस्थांच्या माध्यमातून लक्ष घटकांना, कुटुंबांना सामाजिक-आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्याचे काम सन 2011 पासून सुरु आहे.

ग्रामविकास विभागाच्या आदेशानुसार, अभियानामध्ये कार्यरत कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांचेबाबत घेतलेला निर्णय हा या सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या सेवा आता तात्काळ व नजीकच्या १-२ महिन्याच्या काळात खंडीत करणार आहे.

हा निर्णय जसा या मागिल ८ वर्षापासून कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांच्या वैयक्तिक,कौटुंबिक,आर्थिक, सामाजिक व एकूण भविष्यातील वाटचालीवर विपरीत परिणाम करणारा आहे. तसाच तो गरिबांच्या उभ्या राहिलेल्या समुदायस्तरीय संस्था म्हणजेच समुह, ग्रामसंघ, प्रभागसंघ, उत्पादक गट, कृषी उत्पादक कंपनी व One Stop Facility Centre या सर्व संस्थांच्या प्रगतीच्या आड येणारा असल्याचा आरोप आंदोलनकर्त्या महिलांनी केला आहे.

सध्यस्थितीत राज्यभरातील 500 हून अधिक अधिकारी व कर्मचारी यांची अभियानातील सेवा संपुष्टात आली आहे.

संतप्त आंदोलक महिलांच्या प्रतिक्रिया

या आहेत मागण्या

दिनांक 10/09/2020 रोजीचा अधिकारी व कर्मचारी यांची सेवा खंडित करण्याबाबतचा निर्णय तात्काळ रद्द करून या निर्णयामुळे बाधित झालेल्या अधिकारी व कर्मचारी यांना तात्काळ पुर्ननियुक्ती देण्यात यावी.

या पुढील काळात उमेद MSRLM मूळ मनुष्यबळ संसाधन धोरण नुसारच सर्व कंत्राटी कर्मचा-यांची अभियानातील पदभरती कायम ठेवणेत यावी.

उमेद-अभियानांतर्गत सद्यस्थितीत कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती, पुर्ननियुक्ती, पदभरती व एकूण व्यवस्थापन कोणत्याही परिस्थितित त्रयस्त यंत्रणे सुरु करावे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *