Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्यामहावितरणचा वीज ग्राहकांवर दरवाढीचा प्रस्ताव; आयोगाच्या भूमिकेकडे सामान्यांचे लक्ष

महावितरणचा वीज ग्राहकांवर दरवाढीचा प्रस्ताव; आयोगाच्या भूमिकेकडे सामान्यांचे लक्ष

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

महावितरण (MSEDCL) कंपनीने सुमारे 1500 कोटी रुपये तोट्याचा आर्थिक भार वीज ग्राहकांवरच (electricity consumers) टाकण्याबाबत आयोगाकडे

- Advertisement -

प्रस्ताव पाठवला असल्याने या संभाव्य दरवाढीमुळे घरगुती, व्यावसायिक, शेतकरी अशा सर्वच वर्गातील वीज ग्राहकांना मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. वीज वितरण कंपन्यांचे (Electricity Distribution Company) ग्राहकांसाठीचे वीजदर पंचवार्षिक असतात. त्यानंतर या दरांचा मध्यकालीन आढावा घेतला जातो. सध्याचे दर 1 एप्रिल 2020 पासून लागू झाले आहेत.

त्यानुसार त्यांचा आता मध्यकालीन आढावा घेतला जात असून, त्या अंतर्गत महावितरणने ही दरवाढ प्रस्तावित केली आहे. वीज वितरण कंपनीने महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडे (Electricity Regulatory Commission) सादर केलेल्या आगामी वीजदर वाढीत 37 टक्के वाढीचा प्रस्ताव ठेवला आहे. तर सन 2024- 25 मध्ये आणखी 15 टक्के दरवाढ प्रस्तावित करण्यात आलेली आहे.

या नवीन दरांनुसार, घरगुती ग्राहकांचा दि.1 एप्रिल 2023-24 या काळासाठी सध्या असलेला किमान दर 3.36 रुपये प्रतियुनिट वरून 4.50 रुपये प्रतियुनिट वाढ प्रस्तावित आहे. तर सध्याचा 11.86 रुपये प्रतियुनिट हा कमाल दर आता 16.60 रुपये प्रतियुनिट प्रस्तावित आहे. या दोन्ही श्रेणींमधील सन 2024-25 साठीचा वीजदर अनुक्रमे 5.10 रुपये ते 18.70 रुपये प्रतियुनिट इतका प्रस्तावित आहे.

व्यावसायिक श्रेणीतील ग्राहकांसाठीचा सध्या असलेला किमान 7.07 रुपये ते 9.60 रुपये प्रति युनिटचा दर, आता 12.76 रुपये ते 17.40 रुपये प्रतियुनिट इतका प्रस्तावित आहे. त्यापुढील प्रतियुनिटवरून 9.32 व त्यानंतरच्या वर्षी 10.50 रुपये प्रतियुनिट इतका असेल. लघु दाब श्रेणीतील शेतकर्‍यांसाठीचे (farmers) दर देखील किमान 1.95 प्रतियुनिटवरून 2.70 रुपयेे ते कमाल 3.29 रुपये प्रतियुनिटवरून 4.50 रुपये प्रतियुनिट करण्याबाबत प्रस्ताव आहे. लघुदाब औद्योगिक श्रेणीतील हा दर आता 5.11 प्रतियुनिटवरून 6.90 ते 6.05 रुपये प्रतियुनिटवरून ते 8.20 रुपये प्रतियुनिट प्रस्तावित आहे. उच्चदाब औद्योगिक श्रेणीतील ग्राहकांना आता सध्याच्या 6.89 रुपये नमूद आहे.

वीज नियामक आयोग स्थापन झाल्यापासून ही सर्वात मोंठी दरवाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. यामुळे राज्यभरातील सर्व रहिवासी , व्यापारी, औद्योगिक, शेतकरी व वीज ग्राहक संघटनांनी हरकती नोंदवणे गरजेचे आहे. नागरी दबावातूनच यात काही बदल शक्य आहे.

– प्रताप होगाडे, अध्यक्ष, महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना

- Advertisment -

ताज्या बातम्या