Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्यामहावितरणचा सर्वसामान्यांना झटका

महावितरणचा सर्वसामान्यांना झटका

मुंबई । वृत्तसंस्था Mumbai

आधीच महागाईने होरपळलेल्या सामान्य जनतेला महावितरण ( Mahavitaran ) कंपनीने झटका दिला आहे.महावितरणने इंधन समायोजन आकारात प्रचंड प्रमाणात वाढ केली आहे. राज्य वीज नियामक आयोगाने वीज कंपन्यांना वीज बिलातून इंधन समायोजन आकार वसूल करण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे यापुढे ग्राहकांना जादा आकाराने वीज खरेदी करावी लागणार आहे. त्यामुळे या दर वाढीचा थेट फटका राज्यातील ग्राहकांना बसणार आहे.

- Advertisement -

इंधन समायोजन आकार म्हणजे वीज खरेदी खर्चात वाढ होईल. जून महिन्याच्या बिलात ही वाढ लागू होईल. महावितरणच्या वीज ग्राहकांना इंधन समायोजन आकारामुळे प्रति युनिट सरासरी एक रुपया मोजावा लागणार आहे. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल या चार महिन्यात वीज खरेदीवर झालेला खर्च भरून काढण्यासाठी वीज बिलात ग्राहकांसाठी इंधन समायोजन आकार लागू केला जाणार आहे.

कोळसा आणि इंधनाचे दर वाढल्यानंतर इंधन समायोजन आकारामध्ये महावितरणकडून वाढ करण्यात येत असते. त्याला एमइआरसी यांची परवानगी असते. जून महिन्यापासून ऑक्टोबर महिन्यापर्यंत जो इंधन समायोजन आकार आहे त्यामध्ये प्रचंड वाढ झाली

आहे. मार्च 2022 ते मे 2022 पर्यंत जो इंधन समायोजन आकार होता त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने सध्याचा एफएसी वाढवला आहे. जानेवारी 2022 मध्ये देखील महावितरणकडून प्रति युनिट 25 पैशांची दरवाढ करण्यात आली होती. त्यावेळी देखील महावितणने समायोजन आकाराचेच कारण दिले होते.

इंधन समायोजन आकारातील वाढ

0 ते 100 युनिट आधी 10 पैसे, आता 65 पैसे

101 ते 300 युनिट आधी 20 पैसे , आता 1 रुपये 45 पैसे

301 ते 500 युनिट आधी 25 पैसे, आता 2 रुपये 05 पैसे

501 युनिटच्या वर आधी 25 पैसे, आता 2 रुपये 35 पैसे

- Advertisment -

ताज्या बातम्या