अखेर एमपीएससीचे अधिकृत ट्विटर खाते सुरू

अखेर एमपीएससीचे अधिकृत ट्विटर खाते सुरू

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने (MPSC) ट्विटर खाते (Twitter account) सुरू करण्यात आले आहे. आज (दि.२७) रोजी सायंकाळी ७ वाजता हे खाते सुरू झाले आहे...

अनेक दिवसांपासून विद्यार्थ्यांना संपर्क करण्यासाठी ट्विटर हँडलची मागणी करत होते. आज आयोगाने अधिकृतपणे @mpsc_office या नावाने सुरू करून पहिले ट्विट देखील केले आहे.

यामध्ये नमस्कार!! महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयाचे अधिकृत ट्विटर हॅण्डल सुरू करण्यात आले आहे. सदर ट्विटर हॅण्डलवरून महत्त्वाची प्रसिद्धीपत्रके, महत्त्वाच्या अपडेट्स प्रसिद्ध करण्यात येतील. अशा आशयाचे ट्विट करून त्यांनी सुरुवात केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com