मुंबई

राज्यातील वाढत्या करोना रुग्णसंख्येंच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) १४ मार्चला होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा रद्द केली होती. यानंतर परीक्षा देणारे विद्यार्थी संतापले होते. राज्यात अनेक ठिकाणी आंदोलने झाली होती. अखेरी मुख्यमंत्र्यांनी नवीन तारीख जाहीर करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर शुक्रवारी MPSC परीक्षेची नवीन तारीख जाहीर झाली आहे.

MPSC ची परीक्षा आता १४ ऐवजी २१ मार्च रोजी घेण्यात येणार आहे. पूर्वनियोजित 14 मार्चला होणारी परीक्षा रद्द केल्याने विद्यार्थ्यांचा उद्रेक झाला होता. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल वचन दिल्याप्रमाणे आज MPSC ने परीक्षेची नवी तारीख जाहीर केली आहे.

दरम्यान या परीक्षेच्या तारखा गेल्या दीड वर्षात पाचव्यांदा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे परीक्षार्थी नाराज आहेत. आधी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आणि त्यानंतर कोरोना साथीचं कारण देत ही परीक्षा अनिश्चित काळासाठी लांबणीवर गेली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे. परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने उमेदवारांमध्ये मोठी नाराजी आहे. पुणे येथे याचाच उद्रेक पाहायला मिळाला. हे उमेदवार रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. परीक्षा रद्द केली जाऊ नये अशी या विद्यार्थ्यांची मागणी आहे.

21 तारखेलाच इतरही परीक्षा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 14 तारखेला होणारी पूर्व परीक्षा आता 21 मार्चला होणार असल्याचे जाहीर केले. परंतु, त्या दिवशी इतरही परीक्षा आहेत. त्या दिवशी विमानतळाच्या परीक्षा आहेत. पूर्व परीक्षेचे दोन पेपर असतात. इतर परीक्षा त्या दिवशी असताना त्याच दिवशी उमेदवार एमपीएससीची परीक्षा कशी काय देणार? असा सवाल विद्यार्थी संघटना आणि क्लासेसच्या शिक्षकांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
.इंजिनियरींगला प्रवेश घ्यायचाय?, मग हे जरूर वाचा.
काय म्हणाले होत मुख्यमंत्री

आयोगाची परीक्षा घेण्यासाठी राज्यातील शासकीय कर्मचा-यांचीच यंत्रणा वापरण्यात येते. मला माझ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याची चिंता असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारी यंत्रणा सध्या कोरोना नियंत्रणाच्या लढाईत गुंतली आहे.दुसरे कारण असे की माझा जो विदयार्थी परीक्षा केंद्रावर येणार आहे त्याच्या आरोगयाचे रक्षण करणे ही देखील माझी जबाबदारी आहे.परीक्षांसाठी जे शासकीय कर्मचारी येतील ते कोरोना निगेटिव्हच असले पाहिजेत. त्यासाठी त्यांची चाचणी करून घेणे आवश्यक असेल.तसेच ज्यांचे लसीकरण करण्यात आले आहे अशांनाच परीक्षा केंद्रांवर पाठविण्यात येणार आहे. राज्यात काही ठिकाणी प्रतिबंधात्मक क्षेत्र जाहीर करण्यात आले आहेत. परीक्षा केंद्रे ही या क्षेत्रात असतील तर अडचण होणार आहे.त्यासाठी पर्यायी केंद्रांची व्यवस्था करण्यास वेळ लागणार आहे.त्यामुळेच १४ मार्च रोजीची परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी दिले.